जौहर प्रथा...आणी राणी पद्मावती!


ईतिहासात अनेक प्रथा आपण पाहील्या आहेत.काही चांगल्या तर काही वाईट.सती प्रथा सर्वांना ज्ञात आहे.जिवंत स्ञीला तिच्या पतीच्या चितेवर स्व:इच्छेने किंवा बळजबरीने सती जावे लागत असे.सती प्रथा भारतात अस्तित्वात होती.
अशीचं एक प्रथा किंवा व्रत राजस्थानमधील राजपुतान्यात होते.ज्याला जौहर किंवा जौहर व्रत असे म्हणत.

जौहर म्हणजे...
आपल्या राज्यावर परकीय आक्रमण झाल्यानंतर
त्यात आपल्या सैन्याचा पराभव अटळ दिसला की,राजपुत स्ञिया शञुच्या हाती सापडुन आपल्या अाब्रुचे नुकसान होऊ नये,म्हणुन सामुहीक चिता रचुन अग्निमध्ये देहत्याग करीत व राजपुत योध्दे भगवे वस्त्र परिधान करुन शञुवर तुटुन पडत व रणांगणावर लढता-लढता वीरमरण पतकरीत असतं.

राणी पद्मावतीने केलेला जौहर इतिहासात प्रसिद्ध आहे.अल्लाऊद्दीन खिलजीने चित्तोड वर आक्रमण केल्यानंतर राणी पद्मावतीने चित्तोडगडावरील इतर स्ञियांसोबत जौहर केला.

इतिहासात जौहर वारं-वार झाल्याचे पुरावे मिळतात.जौहर करण्यासाठी कुंडांचा वापर केल्या जायचा.कुंडामध्ये ज्वलनशील लाकुड टाकुन अग्नी दिल्या जायचा.जौहर करणाऱ्या राजपुत स्ञिया देव-देवतांची पुजा करुन कुंडामध्ये उडी घेऊन देहत्याग करायच्या.

जौहर ही प्रथा आज असतीत्वात नाही परंतु ती चर्चेत आली आहे  संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपट 'पद्मावती ' मुळे!
आता भन्साळींच्या चित्रपटात जौहर पुन्हा एकदा पहावयास मिळेल माञ चित्रपट प्रदर्शनापूर्वी झालेले वाद पाहता भन्साळींचा 'जौहर' होऊ नये म्हणजे बस झाले!

ब्रेस्ट कॅन्सर वाढतोय:#PayAttention Breast Cancer Awareness


ब्रेस्ट कॅन्सर ज्या गतीने भारतात वाढतोय ते पाहता महीला व पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर विषयी साक्षर करणं गरजेचं झालं आहे.
ब्रेस्ट म्हणजे स्तन आणी स्तनाला होणारा कॅन्सर म्हणजे 'ब्रेस्ट कॅन्सर'.संपुर्ण देशांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची समस्या आहे माञ योग्य वेळी तो कळाला तर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान देखील शक्य आहे.



(ब्रेस्ट कॅन्सर संपुर्ण माहिती Video By Indian Cancer Society)

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे:
 ⚠ब्रेस्ट कॅन्सर हा ४० ते ४५ ह्या वयोगटातील महीलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
⚠अनुवंशीकतेने
⚠ब्रेस्ट मध्ये झालेल्या गाठींमुळे
⚠व्यसन:दारु पिणे,तंम्बाखु इ.
⚠हॉर्मोन्स गोळ्यांच अतीसेवन
⚠रेडीएशन:CT स्कॅन व X-Ray करताना रेडीएशन च्या जास्त संपर्कात आल्यामुळे देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो.
⚠अबॉरशन:गर्भपात
⚠कमी साईझचे ब्रा घालणे.

 ब्रेस्ट कॅन्सरची काही प्रमुख लक्षणे:
☞ब्रेस्ट/स्तनांमध्ये गाठ होणे.
☞स्तनांमध्ये व काखेत वेदना होणे.
☞स्तनांचा रंग बदलतो,जास्त लाल होणे.
☞निप्पल च्या आजुबाजुला लाल चट्टे पडणे.
☞काखेमध्ये सुज येणे.
☞निप्पलमधुन रक्त येणे.
☞स्तन जास्त नरम होणे.
☞स्तन जास्त कडक होणे.
☞एक स्तन लहान व एक मोठे असणे.
breast cancer marathi
 ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे


ब्रेस्ट कॅन्सर चे निदान व तपासणी:
☞ब्रेस्ट कॅन्सरची वर दिलेली लक्षणे  महीलांनी प्रत्येक महिण्याला  आरशा समोर उभे राहुन तपासावीत व काही लक्षणे दिसुन आल्यास डॉक्टरांना त्वरीत दाखवावे.
☞ब्रेस्ट कॅन्सरसाठी मैमोग्राफी टेस्ट आहे.मैमोग्राफीमध्ये ब्रेस्टचा एक्सरे काढल्या जातो.ज्यामध्ये तांदळाच्या दाण्या एवढ्या गाठी सुद्धा दिसतात.ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर चे निदान करताना ब्रेस्ट काढावे लागत नाहीत.
माञ ब्रेस्ट कॅन्सर एडवान्सडं स्टेज मध्ये असेल तर ब्रेस्ट ऑपरेशन द्वारे काढावे लागते.
(मैमोग्राफी बद्दल माहिती देणारा व्हिडीओ)

 ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांनाच होतो का ? तर नाही तो पुरुषांना सुद्धा होऊ शकतो माञ त्याचे प्रमाण कमी आहे.आतापर्यंत भारतामध्ये ७०००० हजार महीलांना ह्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे आपला जिव गमवावा लागला आहे व २०२० पर्यंत  आणखी ७०००० महीलांना आपला जिव गमवावा लागेल अशी शक्यता एका अभ्यासातुन पुढे आली आहे.ब्रेस्ट कॅन्सर भारतात शहरी भागात आढळतो माञ आता ग्रामीण भागातही तो वाढत आहे.त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची माहिती सर्वांपर्यंत पोहचनं गरजेचं आहे.कारण योग्य वेळी त्याच्यावर उपचार शक्य आहेत.
ही जबाबदारी सर्वांची आहे कारण आपण भारतात राहतोत जिथे अंधश्रद्धा लोकांमध्ये फुटुन भरलेली आहे.स्तनात गाठ झाली तर आमच्याकडे महीला कोणीतरी करणी केली असं म्हणतील म्हणुन ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आपल्या परीवारातील प्रत्येकांना द्या...!
✍संदीप डाके। Blogger 
©२०१७

संदर्भ:
१.http://www.onlymyhealth.com
2.Medifee.com
3.Indian Cancer Society

डोंबारी...आयुष्यभर भटकणारा समाज!

sandip dake blog
जन्माचे गावं नाही,घराचा पत्ता नाही,मतदान नाही,आधार नाही,रहीवाशी नाही,शिक्षण नाही अशी अवस्था आहे येथील भटक्या जमातींपैकी एक असलेल्या 'डोंबारी' समाजाची.
१९६५ ला उषा चव्हाण यांनी गायलेल्या आेळी

उद्याच्या पोटाची काळजी कशाला,
आभाळ पांघरु दगड उशाला,
गाळुनी घाम आता मागु या भाकरी।

नाचतो डोंबारी गं 
नाचतो डोंबारी।।

वरील ओळी या डोंबारी समाजाचं वास्तव चित्र सांगणाऱ्या आहेत.
डोंबारी ही जमात आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगना,राजस्थान,तामीळनाडु,ओरीसा,हिमाचल प्रदेश,बांग्लादेश व महाराष्ट्रात आढळते.
डोंबारी समाजाचा ईतीहास फारसा मिळत नाही.महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईत डोंबारी त्यांच्या सोबत असल्याचे काही लेखी पुरावे मिळतात तर छञपती शिवरायांच्या ईतीहासातई डोंबारी समाजाचे उल्लेख सापडतात.महाराष्ट्रात डोंबारी राजस्थानमधुन भटकत आल्याचे बोलले जाते.डोंबारी हा सध्या तरी खेळ करुन भिक मागुन जगणारा समाज आहे.डोंबारी समाजात मुलीचे लग्न हे बालवयातचं केले जाते आणि हो लग्न करण्यासाठी तिला डोंबाऱ्याचे सगळे खेळ येणे बंधनकारक असतात.जर तिला हे खेळ येत नसतील तर अशा मुलींचे लग्न सुद्धा होत नाहीत.डोंबाऱ्याच्या घरी मुल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण म्हणजे काय हो,६' इंचाच्या गोल रिंगमधुन संपुर्ण शरीर आत टाकणे व बाहेर काढणे हा खेळ प्रकार करताना त्या चिमुकल्या जिवाला असह्य वेदना होतात त्या जाणवु नये म्हणुन गावठी दारु पाजली जाते व लहान पाखरं अल्पवयातचं व्यसनाच्या आहारी जातात.
आॅल्म्पीक मधील खेळाडुंना ही लाजवेल अशा कसरती डोंबारी समाजातील मुली करतात.
डोंबारी समाजात एक प्रथा आहे ती म्हणजे अंघोळ न करण्याची.विशेष करुन महिलांना वर्ष-सहा महीने अंघोळ करु दिली जात नाही ज्यामुळे महिलांच्या अंगाचा वास येतो ज्यामुळे परपुरुष तिच्याकडे आकर्षीत होत नाही.
डोंबाऱ्याचं बिऱ्हाड आज या गावाला तर उद्या दुसऱ्या म्हणुन या अंघोळ न करण्याच्या प्रथेचा गावगुंडांपासुन आपली अब्रु वाचवण्यासाठी उपयोग होतो.
डोंबारी महिलांना स्वयंपाक येत नाही.ज्या गावात खेळ तिथेचं काही घरी भिक मागुण आपल्या कुटुंबाच्या पोटाची कशी-बशी आग विझवली जाते.
पुर्वी म्हणजे आमच्या लहानपणी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धा गावं जमा होऊन हा खेळ पहायचां.त्याच्यामध्ये रिंगमधुन शरीर बाहेर काढणे,तारेवर बांबु घेऊन चालने,कोल्हाट उड्या मारणे,डोळ्यात सुई पकडणे अशे नानाप्रकारचे साहसी व धाडसी खेळ दाखवले जायचे.खेळ झाल्यावर जमलेले बघे आठ आणे,रुपया व जास्तीत-जास्त दहा रुपयं द्यायचे.माञ आता परीस्थीती बदललीयं! कालचं आमच्या गावी खुप दिवसानंतर  डोंबारी कुटुंब खेळ करण्यासाठी आले माञ त्यांना बघणारे डोळेही कमी झाले आणि देणारे हातही.
बदलत्या काळात हा समाज खुप पाठीमागे राहिला.या समाजाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा फायदा झाला नाही.हा समाज सुधरला पाहिजे यासाठी लातुरमधील आमचे मिञ नरसिंग झरे यांनी प्रयत्न सुरू केले.त्यांनी सर्वप्रथम या डोंबाऱ्याना लातुरमधील अनसर वाड्यावर स्थाईक केले.येथे त्यांना स्वयंपाक करायचे शिकवुन डोंबारी महीलांना रोजगार मिळवुन दिला.डोंबारी पुरुषांना बॅंड पथकाचे प्रशिक्षण देऊन व्यसनांपासुन परावृत्त केले.
डोंबारी समाजातील  मुले आता नरसिंग झरेंच्या सांगण्यावरुन शाळेत जातात.निश्चितच ही चांगली बाब आहे.माञ आजही हा समाज न्यायापासुन वंचीत आहे.शासन या बाबतीत उदास आहे.त्यामुळे  समाज म्हणुन आपणचं येथुन पुढं त्यांच्या मदतीसाठी पुढे यायला पाहिजे. डोंबाऱ्याचा खेळ दिसला तरं बघा आणी त्यांना मदत करा! डिजीटल इंडीया च्या नादात आमचा गावरान इंडीया लोक विसरत चालले आहेत.
अशा ५२ जाती एकट्या महाराष्ट्रात आहेत ज्यांना अन्न,वस्ञ व निवारा नाही,स्वतःची ओळख नाही. गायी-म्हशी सारखं बाळंतपण होतं ओ, या माता-भगीनींचं! मगं आम्ही विकसीत झालो हे ढोल बडवणं तरी बस्स करा.
बुलेट ट्रेन आणा हो ती श्रीमंतांच्या चैनीसाठी आवश्यक आहे परंतु खेड्यात राहणाऱ्या वंचीत जातींना  मुलभुत सुविधा तरी द्या!ते ही या देशाचे नागरीक आहेत.(हा माञ एक नक्की आहे त्यांच्याकडे या देशाचे रहीवाशी असल्याचा एकही पुरावा नाही माञ गायींना आधार कार्ड आहे)

✍संदीप डाके।Blogger
©२०१७

sandip dake blog
Dombari girl

sandip dake blogsandip dake blog