बंद करा ! शिक्षणाच्या नावाखाली पैसा खाने बंद करा!

education


शिक्षण माणसाला माणूस बनवतं.माणूस पैशाने कितीही मोठा असला तरी तो ओळखला जातो त्याच्या ज्ञानाने.ज्ञानदान हे पूर्वी पवित्र कार्य माणलं जायचं,पण आज या आधुनिक युगात ते केवळ अाणी कॆवळं पैसा कमावण्याचॆ साधन बनले आहे.मराठी हि आमची मातृ भाषा.मराठी शाळांतच आम्ही भाषिक विषयांच ज्ञान प्राप्त केलं त्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागली नाही.जि.प शाळा ते शिवाजी विधी महाविद्यालय हा प्रवास झाला.इंग्रजी हा विषय शाळेत समजून घेतल्यानंतर पुन्हा त्याला वेगळं अभ्यासायची वेळ पडली नाही.पण आज २०२१ मध्ये  शिक्षणाचा बाजार सामाण्य माणसाचे कंबरडे मोडणारा आहॆ.इंग्रजी हि जागतिक भाषा समजली जाते तिला आपला विरोध नाही पण इंग्रजी शिकण्यासाठी घेतले जाणारे मुल्यं अनेकांच्या पोटाला चिमटा घॆणारॆ आहॆ.

२०१७ सालची बातमी होती १३०० मराठी शाळा बंद होणार,झाल्या.२०१९ मध्ये ५००० च्या वरती आकडा गॆला.मागच्या पंधरा वर्षात एकट्या मुंबईत २२१ अनुदानीत मराठी शाळा बंद झाल्या आहॆत.यामागे कमी पटसंख्या,दोन लगत असणाऱ्या शाळा,गुणवत्ता इत्यादी कारणे देऊन या शाळांना टाळॆ लावण्यात आले आहेत.पण पडद्या मागची कहाणी थोडी वेगळी आहे.


मराठी शिक्षण हे मोफत आहे.

त्या अनुषंगाने शिक्षणाला व्यवसाय समजणाऱ्या लोकांनी गांव तिथं  शिक्षण संस्थां निर्माण करुन शासन अनुदान प्राप्त करुण घेतले.प्रचार असा केला की जिल्हा परिषद शाळांपेक्षा खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात.हा प्रयोग यशस्वी झाला.जिल्हा परिषद शाळांना पालक वर्ग नजरांदाज करु लागला.खाजगी शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांनी पैशाचा अपव्यवहार करत करोडोंची माया जमा केली.एकीकडे माया जमा झाली आणी दुसरीकडे कमी होत गेली.

आज प्रशासनाचाचं पैसा वापरून या लोकांनी इंग्रजी शाळांच मार्केटिंग करून पालक वर्गाच्या डोक्यात पक्क भुत बसवलयं की भविष्य फक्त इंग्रजी मध्येचं आहॆ.लाखोंच्या फिस,ड्रॆसकोड,डिजिटल साधणं हे चक्रव्यूह असं तयार केलयं की एखादा यात फसला की परत बाहेरचा मार्ग नाही.

आपली मायबोली,राजभाषा आणी नंतर इंग्रजी अशी सुसंगत शिक्षण पद्धती पालकांनी निवडणं गरजॆचं पण आज शिक्षणातून इंग्रजी अट्टाहास पाल्यांना अर्थहिन शिक्षण देणारा ठरणार आहॆ.

आजही आपल्याकडॆ शिक्षण हे केवळ नौकरी मिळावी म्हणून घेतल्या जाते.पण मागच्या पाच वर्षात शिक्षण व्यवस्थॆतुन करोडोंमध्यॆ बाहेर पडणारे बेरोजगार नौकरीच्या प्रतीक्षेत आहॆत ? काहींनी कंटाळून आत्महत्या केल्या...काहींनी शिक्षणाचा वापर करुन पोट भरण्यासाठी गैरव्यवहार केले...काही गुन्हेगारी क्षॆञात उतरले तर काहींनी हाताला पडेल ते काम करुन उदरनिर्वाह भागवला.

मराठी शाळेतला विद्यार्थी हा शेतात एकवॆळॆसं पाहिजे ते काम करुन पोट भरेल पण इंग्रजी माध्यमात शिकुन मोबाइल व मोटारसायकल वापरणारा विद्यार्थी भविष्यात हार्ड काम करेल हि अपेक्षा नाही.जागतीकीकरणाचा भारताला काय फायदा झाला हे नंतर तपासु पण इंग्रजी शिकवुन त्यांनी मोठा ग्राहक वर्ग भारतात तयार कॆलायं.ज्याचा फायदा पाश्चिमात्य देश करुन घॆत आहॆत.

शिक्षणं जर नौकरी मिळवण्यासाठी  म्हणून घॆतलं जात असॆल तर,माध्यम कोणतही असू द्या बॆरोजगारचं बाहेर पडणार आणी पडत राहतील.दहा वर्ष इंग्रजी माध्यमाचं शिक्षण किमाण दस लक्ष घालवणारं आहॆ जे वाढत्या महागाई सोबत वाढतचं

जाणारं एवढा अट्टाहास करुण बॆरोजगारी पदरात पडणार असेल तर सामाण्य,मध्यमवर्गीय लोकांनी या मायाजाळात न सापडलॆलचं बरं!


BlogWriter:SRD(Sandip Rangnath dake)

------------------------------------------------------------------

VideoCredits

Music,Lyrics,Singer:RapBoss(Ajit Shelake)

Production:ChetanGarudProductionPvtLtd

आईचं दुध मिळेल का हो...?


 "अहो!आता हे काय नविण.आईचं दुध कुठं मिळत असतं का? कोणती आई आपल्या बाळाचं दुध देईल आणी तुम्हाला काय करायचंय त्या दुधाचं.असे भलतॆ-सलतॆ विचार डोक्यात आणतं जाऊ नकास बरं!"
अगं तसं नाही,माझ्या मित्राची बायको सिझर डिलीव्हरी झाली.आठ दहा-दिवस बाळाला पोटभर दुध होतं.पण बाळ आता खुप रडतयं,डाॅक्टरांनी सांगीतलं बाळाचं पोट भरत नाही.
बाळाची भूक वाढलीय अाणी त्यामुळॆ रडतयं!आईचं दुध कमी झालयं.आपण उपचार करु पण फरक नाही पडला तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल.
बाळाच्या आईला Milk Deficiency आली आहे.बाळाचं पोटं भरणं गरजॆचं आहे आणि अजून सहा महिने जायचे आहेत.निदान सहा महिने तरी बाळाला आईचं दुध मिळावं.
असं बोलून तो रडतं होता.मला तो कुणी तयार होईल का असं विचारतं होता.मी म्हटलं आम्ही राहतो ग्रामीण भागात.इथं आधीचं अंधश्रध्द माणसं.कुणाला म्हणावं तर भलताचं संशय घेतील आणी मला नाही वाटतं कुणी दुध देण्यासाठी तयार होईल.
त्यापेक्षा मी त्याला सल्ला दिला आपण वरचं दुध द्यावं.उगाचं यात वेळ घालण्यात मजा नाही.बाळाची आणि आईची काळजी घॆ असं बोलून फोन ठेवला.
"योग्य केलं तुम्ही,असं आईचं दुध लांबच्या व्यक्तीला कोण दॆईल.हा,एखादवॆळॆस घरातलं बहिणीचं,नंदाचं बाळं असतं तर तयार झालं  असतं कुणी पण लांबच्या व्यक्तीसाठी कोणती आई आपला पान्हा झिझवॆल."
अगं,पण आज सकाळी परत आमचं फोनवर बोलणं झालं.खुप आनंदात बोलत होता तो मला.
"आनंदात बोलत होता,बाळाच्या आईचं दुध वाढलं वाटतं" अगं थांब आधी निट ऎकुण तरी घॆ.
बाळाची आई आहे तशीचं आहॆ.पण पर्यायी आईच्या दुधाची व्यवस्था झालीयं म्हणं! "बरचं झालं बाई,त्या तान्ह्या बाळाचं पोट तरी भरेल.त्या माय माउलीचे खरचं चांगल होईल जी आपला पान्हा त्याला देईल".
अगं तो सांगत होता दुध डायरेक्ट द्यायला तयार नाही झालं कोणी.पण आईचंच दुध आहॆ."असं कसं" हो माझ्याही मनात हाचं प्रश्न होता.मी त्याला विचारलं आणी मग त्याने सविस्तर मला सांगितलं.
मदर मिल्क बॅंकॆतुन दुधाची व्यवस्था झालीयं म्हणे."हे काय नविण,आईच्या दुधाची कुठं बॅंक असतीयं का?" हो मलाही असचं वाटलं.पण आता भारतात मदर मिल्क बॅंक सुरु झाल्या अाहॆत म्हणे.या बॅंकॆत म्हणे ज्या आईंना हाइपरलॆटॆक्शन सिंड्रोम झाल्यामुळॆ तिच्या शरीरात आवश्यकतॆपॆक्षा जास्त दुध तयार होतं.
त्यामुळे बाळानॆ पिऊन उरलेलं दुध या मदर बँकेत डोनॆट करतात आणि ज्या बाळांना गरज आहॆ अशांना या बँका दुध पुरवतात.
"खरचं का?" हो,माझाही विश्वास नसतं नव्हता अाधी.पण गुगलला विचारल्यावर माझी खात्री बसली.जवळपास भारतात अशा विस बँका आहॆत.
"बरं हे दुध चांगलं असत का? म्हणजे काही प्रोब्लॆम तर येत नाही ना बाळाला" अजिबात नाही.कारण ज्या आईचं दुध डोनॆट म्हणून घेतलं जातं आधी तिच्या टेस्ट होतात.जसे की HIV,Hepatitis,Drugs,Liquor Addict  इ. नाॅर्मल असेल तरचं ते दुध डोनॆट म्हणून घेतलं जातं."बरं,मग बाई छान आहे.आता बाळं आईच्या दुधावाचुन वंचित राहणार नाही". खरयं पिल्लू पण,यासाठी ज्या आईंना दुध जास्त आहॆ त्यांनी डोनॆट करणं देखील गरजॆचं आहे आणी यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणं गरजॆचं आहे.
"नक्की मी ही माहिती जास्तीत जास्त माझ्या मैत्रीनींना पाठवॆल" हो जसं आपण रक्तदान,अवयवदान,नॆत्रदान करतो आणी काहींचे जीव वाचवतो अगदी तसचं दुधदान करुण आपण अनेक बाळांच आयुष्य वाचवू शकतो.
याला इंग्रजीत Liquid Gold म्हटलयं पिल्लू.
हे  Liquid Gold नवजात बालकांच्या आयुष्यात नवी पहाट आणते.

✍अॅड.संदीप डाके |Blogger
©2019
_________________________
List of Human Milk Banks in India
Below is a list of the Human Milk Banks in India –

Divya Mother Milk Bank, Udaipur, Rajasthan
Amara Milk Bank (In collaboration with Fortis la Femme), Greater Kailash, New Delhi
Lokamanya Tilak Hospital (Sion Hospital), Sion, Mumbai
Vijaya Hospital, Chennai
KEM Hospital, Parel, Mumbai
Deena Nath Mangeshkar Hospital and Research Centre, Pune
Institute of Child Health, Egmore, Chennai
Sir JJ Group of Hospitals, Byculla, Mumbai
SSKM Hospital, Kolkata
Cama Hospital, Fort, Mumbai
________________________

जॆल देता का जॆल...आमचा श्वास गुदमरतोय!


अहो ऐकानं...आपल्या देशातील जॆल(कारागृह) ओव्हरफ्लोव झाली आहेत.तुम्ही म्हणाल,होउद्या! त्यात काय नविण.शेवटी कैदीचं न ते.गुन्हॆगार माणसं ती.कुणाची तरी आब्रु लुटून,कुणाचा मर्डर करुन,कुणाच्या घरी चोरी,डाका  टाकुनचं मधात गेली ना?
हो,असचं काही कारणं असेल.आणी म्हणुनचं त्यांना न्यायासणानॆ शिक्षा सुनावली असणारं.मी सहमत आहे तुमच्या या मताशी.
पण अहो न्यायासणानॆ त्यांना शिक्षा सुनावली ती त्यांना कॆलेल्या गुन्हयाची जाणीव आणि अद्दल घडवण्यासाठी.त्याला पश्चाताप व्हावा यासाठी...व कायदा सुव्यवस्थॆचं राज्य अबाधित राहण्यासाठी.
हो,न्यायदॆवतॆचं पारडं एका बाजुनॆ झुकत नाही.फिर्यादीला न्याय आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीचं पाहिजे.तरचं याला कायद्याचं राज्य म्हणता येईल.
बरं,कैद्यांचं जेवण,राहणं,पिणं,कपडॆ मनोरंजनाची साधणं ही आपल्यापॆक्षा वेगळी खालच्या दर्जाची आहॆत आणी असायलाहीतं पाहिजे.
कारण त्यांना आपल्या सारख्याचं सुख-सुविधा मिळाल्यावर मगं कशाचा पश्चात्ताप आणि कशाची शिक्षा! आधिचं भारतात बेरोजगारी वाढलीयं आणि जॆल मध्ये लक्झरी सुविधा मिळतात हे ऐकून बेरोजगार सर्रास गुन्हॆ करुन जॆल मध्ये जातील.अहो हा विनोद नाही परिस्थितीचं तशी आहे.
असो, कैद्यांना सुख-सुविधा मिळू नयेत इथपर्यंत ठिक आहे हो.पण किमाण मोकळा श्वास तरी घेता यावा...शेवटी माणसचं ना ती.त्यांना ही ऋदय आहॆ आणी त्या ऋदयाला शुद्ध नसुद्या पण जगण्यापुरती तरी हवा मिळावी.
जॆल मध्ये गेल्यावर भलॆ-भलॆ निट होतात ओ...हो कारण शेवटी जॆलचं ना ते.पश्चाताप होतो वं त्यांनाही कॆलॆल्या गुन्ह्याचा.
सर्हाईत गुन्हॆगार सोडून द्या पण ज्यांच्या हातून पहिल्यांदाच गुन्हा  घडला आहे अशांना तरी आपण सुधरण्याची  संधी द्यावी असं मला वाटतं.
काल परवा गृह मंत्रालयाने काही आकडॆ जाहीर केले ते ऐकून जरा धक्काचं बसला.
देशात १४०१ तुरुंग हाउसफुल नाही तर ओव्हरफ्लोव आहेत.१४०१ तुरूंगाची कॅपॅसिटी ३ लाख ६६ हजार ७८१ एवढी आहे.परंतु आज घडीला ४ लाख १९ हजार ६२३ कैदी या जेलमध्ये शिक्षा भॊगत आहे.
जसं शेळ्यामेंढ्यांना कोंडतात अगदी तसचं यांना कोंडलयं ओ!त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतोयं.
तुम्ही म्हणालं जाउद्यानं संदिपराव जॆल आणि शहरातं तरी कुठं फरक राहीलायं रस्त्यावर गर्दी,वाहणांचं प्रदूषण,ट्रेनमध्यॆ होेणारी घुसमट,सिमॆंटची जंगल यात कुठं मिळतो मोकळा श्वास!इथही आता कोंडल्यासारख होतयं आणि तुम्ही व्यथा मांडताय कैद्यांची!इथं चांगल्या माणसांनाचं काही चांगलं भेटत नाही तर कैद्यांना कुठून भॆटणारं.
खरं आहे ओ...आपल्याला तरी कुठे मिळतो मोकळा श्वास.पण विषय फक्त मोकळ्या श्वासाचा नाही खंडेराव.ठिक आहे एवढे कैदी कशॆ-बशॆ राहतील त्या कोंदड-दमट वातावरणात पण नवोदित गुन्हेगारांना टाकायचं कुठं हाही प्रश्नचं नाही का?
हो,आता माझ्या लक्षात आलं तुम्हाला नेमकं म्हणायचयं काय.संदिप खरं आहे तुझं.आपली जॆल आताचं फुल आहेत आणी भविष्यात जर काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर खरचं अवघड आहे.
हा...कैद्यांनाही मोकळा श्वास मिळावा व आपली सामाजीक शांतता दॆखिल भविष्यात अबाधित रहावी यासाठी नविण जॆल या सुजाण सरकारने बांधावीत हिचं अपेक्षा खंडेराव!
-----------------""----------------------
✍अॅड.संदीप आर डाकॆ
©२०१९ । Blogger
_________________________

लावणीसम्राट किरण कोरॆ...!
आपल्या सॆलु मध्ये शिवजयंती निमीत्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येत आहे.यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.दि १९ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ६ वाजता किरण कोरॆ यांचा लावण्यविष्कार होणार आहे.
काल एका मित्राने मला प्रश्न केला की,शिवजयंती मध्ये हा लावण्यांचा कार्यक्रम योग्य आहे का?
त्या मित्राला पहिले मी विचारले,तुला किरण कोरॆ माहीत आहे का कोण आहे? यावर त्याचे उत्तर होते, "नाही".
मग मी त्याला समजून सांगितले आणि त्याचे समाधान झाले.
किरण कोरॆ हे नाव मुलीचे नसुन मुलाचे आहे.किरण हा आपल्या जवळचा जिल्हा नांदेड येथील आहे.
लहानपणापासून लावणीची आवड असणाऱ्या किरणनॆ लावणी मध्ये करियर करण्याचे ठरवलॆ.अखंड मॆहणत घेऊन किरणनॆ या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.
किरणच्या या ध्यॆयात त्याला अनेक अडचणींचा सामणा करावा लागला.अनेकांनी त्याला नावं-बोटं ठेवली तर कोणी खिल्ली उडवली.मात्र आज किरणचॆ यश बघून हिचं मंडळी त्याचे कौतुक करत आहे.
संपुर्ण महाराष्ट्र आज किरणला ओळखतोय.आतापर्यंत डझनभर पुरस्कारांनी किरणचा गौरव करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रीलंका येथे त्याला गोल्ड मॆडल सुद्धा मिळाले आहे.
पुरूष असुन सुद्धा किरणनॆ लावणीसारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे व सातत्याने तो मॆहणत घेतोय.लावणी सोबतचं तो एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे.वरील फोटो बघून तुम्हाला त्याचे या क्षेत्रातील कौशल्य लक्षात आलॆचं असेल.
सॆलुचा मराठवाड्यातील पुणे असा नेहमी उल्लेख होतो.किरण कोरॆ यांच्या कलेला  नक्कीचं दाद मिळॆल.किरण कोरॆंचा हा लावण्यविष्कार नक्की बघाचं.
_____________________
✍🏻संदिप डाकॆ |Blogger

रॆहानाचॆ अंतिम पत्र...!


रॆहानाचॆ अंतिम पत्र...!
जबरदस्ती सॆक्स करु पाहणाऱ्या व्यक्तीला रॆहानानॆ धारदार चाकूने भोसकून ठार केले व अापली आब्रु लुटता-लुटता वाचवली.
मात्र इराणच्या कोर्टाने रॆहानाला ७ वर्ष तुरूंगात डांबून ठेवून २५ आॅक्टोंबर २०१४ ला  फाशी दिली.
रॆहाना जब्बारी या २६ वर्षीय इराणी महिलॆला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खुप प्रयत्न झाले मात्र इराणी कायदे यात अडचणीचे ठरले.
मुर्तजा अब्दालीने तिची अब्रु लुटण्याचा प्रयत्न केला होता व रॆहानानॆ सेल्फ डिफेन्स म्हणून पाॅकॆट मधील चाकूने त्याची हत्या केली.
रॆहानानॆ आपल्या मृत्यु पूर्वी एक पत्र लिहिले ज्यामध्ये तिने आपल्या आईकडे अवयव दानाची इच्छा प्रकट केली.
ह्रदय पिळवटून टाकणारे पत्र रॆहानानॆ लिहिले होते.रॆहाणाला फाशी दिल्यानंतर इराणच्या शांती समर्थक कार्यकरत्यांनी हे पत्र सार्वजनिक केले.
आपल्या मनातील भावना तिने या पत्रात शब्दबद्ध केल्या आहेत.
ती या पत्रात म्हणते,

मेरी प्रिय मां,

आज मुझे पता चला कि मुझे किस्सास (ईरानी विधि व्यवस्था में प्रतिकार का कानून) का सामना करना पड़ेगा। मुझे यह जानकर बहुत बुरा लग रहा है कि आखिर तुम क्यों नहीं अपने आपको यह समझा पा रही हो कि मैं अपनी जिंदगी के आखिरी पन्ने तक पहुंच चुकी हूं। तुम जानती हो कि तुम्हारी उदासी मुझे कितना शर्मिंदा करती है? तुम क्यों नहीं मुझे तुम्हारे और पापा के हाथों को चूमने का एक मौका देती हो?

मां, इस दुनिया ने मुझे 19 साल जीने का मौका दिया। उस मनहूस रात को मेरी हत्या हो जानी चाहिए थी। मेरा शव शहर के किसी कोने में फेंक दिया गया होता और फिर पुलिस तुम्हें मेरे शव को पहचानने के लिए लाती और तुम्हें पता चलता कि हत्या से पहले मेरा रेप भी हुआ था। मेरा हत्यारा कभी भी पकड़ में नहीं आता क्योंकि हमारे पास उसके जैसी ना ही दौलत है, ना ही ताकत। उसके बाद तुम कुछ साल इसी पीड़ा और शर्मिंदगी में गुजार लेती और फिर इसी पीड़ा में तुम मर भी जाती। लेकिन, किसी श्राप की वजह से ऐसा नहीं हुआ। मेरा शव तब फेंका नहीं गया। लेकिन, इविन जेल के सिंगल वॉर्ड स्थित कब्र और अब कब्रनुमा शहरे रे जेल में यही हो रहा है। इसे ही मेरी किस्मत समझो और इसका दोष किसी पर मत मढ़ो। तुम बहुत अच्छी तरह जानती हो कि मृत्यु जीवन का अंत नहीं होती।

तुमने ही कहा था कि आदमी को मरते दम तक अपने मूल्यों की रक्षा करनी चाहिए। मां, जब मुझे एक हत्यारिन के रूप में कोर्ट में पेश किया गया तब भी मैंने एक आंसू नहीं बहाया। मैंने अपनी जिंदगी की भीख नहीं मांगी। मैं चिल्लाना चाहती थी लेकिन ऐसा नहीं किया क्योंकि मुझे कानून पर पूरा भरोसा था।'

मां, तुम जानती हो कि मैंने कभी एक मच्छर भी नहीं मारा। मैं कॉकरोच को मारने की जगह उसकी मूंछ पकड़कर उसे बाहर फेंक आया करती थी। लेकिन अब मुझे सोच-समझकर हत्या किए जाने का अपराधी बताया जा रहा है। वे लोग कितने आशावादी हैं जिन्होंने जजों से न्याय की उम्मीद की थी! तुम जो सुन रही हो कृपया उसके लिए मत रोओ। पहले ही दिन से मुझे पुलिस ऑफिस में एक बुजुर्ग अविवाहित एजेंट मेरे स्टाइलिश नाखून के लिए मारते-पीटते हैं। मुझे पता है कि अभी सुंदरता की कद्र नहीं है। चेहरे की सुंदरता, विचारों और आरजूओं की सुंदरता, सुंदर लिखावट, आंखों और नजरिए की सुंदरता और यहां तक कि मीठी आवाज की सुंदरता।


बिहार की पूर्णिया में रूपम पाठक भी कभी ह्त्या के लिए मजबूर हुई थी
मेरी प्रिय मां, मेरी विचारधारा बदल गई है। लेकिन, तुम इसकी जिम्मेदार नहीं हो। मेरे शब्दों का अंत नहीं और मैंने किसी को सबकुछ लिखकर दे दिया है ताकि अगर तुम्हारी जानकारी के बिना और तुम्हारी गैर-मौजूदगी में मुझे फांसी दे दी जाए, तो यह तुम्हें दे दिया जाए। मैंने अपनी विरासत के तौर पर तुम्हारे लिए कई हस्तलिखित दस्तावेज छोड़ रखे हैं।

मैं अपनी मौत से पहले तुमसे कुछ कहना चाहती हूं। मां, मैं मिट्टी के अंदर सड़ना नहीं चाहती। मैं अपनी आंखों और जवान दिल को मिट्टी बनने देना नहीं चाहती। इसलिए, प्रार्थना करती हूं कि फांसी के बाद जल्द से जल्द मेरा दिल, मेरी किडनी, मेरी आंखें, हड्डियां और वह सब कुछ जिसका ट्रांसप्लांट हो सकता है, उसे मेरे शरीर से निकाल लिया जाए और इन्हें जरूरतमंद व्यक्ति को गिफ्ट के रूप में दे दिया जाए। मैं नहीं चाहती कि जिसे मेरे अंग दिए जाएं उसे मेरा नाम बताया जाए और वह मेरे लिए प्रार्थना करे।
--------------------------------------
✍🏻संदीप डाकॆ |Blogger
©२०१८

ब्लाॅग वाचा खालील लिंकवर

शेतकरी नवरा नको गं बाई!


शेतकरी नवरा नको गं बाई!
सध्या महाराष्ट्रातील शॆतकरी एका नविण दुष्काळाला तोंड देत आहे.या आधी असा दुष्काळ त्याने या आधी कधी पाहिला हि नाही आणि अनुभवला ही नाही.
शॆतकरी बाबुराव बोलताना सांगत होते,"मया पाहण्यात तरी असा दुष्काळ म्या कधी बघीतला नाय.वला दुष्काळ व कोरडा दुष्काळ म्या बघीतलाय पणं ह्यो भलताचं दुष्काळ आमच्या शॆतकऱ्याच्या पोराच्या नशिबी आलायं"
खरंतरं दुष्काळ आणि शेतकरी हे अाता समानार्थी शब्द वाटतात.पण आता आलेला हा दुष्काळ जरा चमत्कारिक आहे.
अशा दुष्काळाची कल्पना याअाधी कुणीचं केली नव्हती.हा दुष्काळ आहे "उपवर वधुंचा"
समाजातील कोणत्याचं वर्गातील मुलींची उपवधु शेतकरी तरूणांना जोडीदार म्हणून पसंती नाहीए.इतकचं काय तर अगदी शेतकरी कुटुंबातील मुली सुद्धा नाक मुरडताना दिसत आहे.याला कारण ही तसॆचं ठोस आहे.
आज मितीला गावात प्रत्येक समाजामध्ये शेतकरी तरुण लग्नासाठी तयार आहेत.अनेकांनी देव पाण्यात ठॆवलॆतं,तर काहीं नवस बोलत आहेत मात्र मुलींच्या वडिलांनी सप शेल पाठ फिरवली आहॆ.
मुलीकडच्यांनी मुलाला स्थळ देण्याची प्रथा होती मात्र आता शेतकरी उपवधु तरूणांना मुलीला मागणी घालावी लागत आहे.त्यातही आम्हाला काहीचं नको फक्त लग्न लावून द्या असा आर्जव मुलावालॆ करत आहेत.
आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले तर अनेक शेतकरी पुत्रांना सक्तीने अविवाहित रहावे लागेल.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळॆ शेतकरी कुटुंबातील मुली अापल्या शेतकरी बापाची परिस्थिती पाहुण आहॆत.अठरा विश्व दारिद्रय,नेहमी दुष्काळाने पिडीत झालेला,नेहमी खिसा रिकामा असणारा,डोक्यावर कर्जाचे अोझॆ वाहणारा शेतकरी नवरा कोणत्याही मुलीला नकोय.
मुली शेतकरी तरुणाचॆ स्थळ बघायला नकार देत आहेत.त्यांच्यामते व्यवसाय करणारा किंवा झाडु मारायची नोकरी असेल म्हणजे पिउन असेल तरी चालेल मात्र शेतकरी नको.
यामुळे शेतकरी उपवधु तरुण हवालदिल झाले आहेत.सोयरिक जमवण्यासाठी वॆगवॆगळ्या शक्कल लढवल्या जात आहॆत.अनेक जण फुकटचं संस्थॆवर काम करत आहेत व आम्हाला चांगला पगार आहे म्हणून सांगतात तर काही दुकान टाकून बसत आहेत.
शॆतकऱ्याला ढोर मेहनत करुन सुद्धा हाती काहीचं लागत नाही त्यामुळे निदान आपल्या पोटच्या गोळ्याला हे दिवस दिसून येवू नयेत म्हणून शेतकरी वडील सुद्धा शेतकरी उपवधु तरुणाला नकार देत आहेत.
त्यामुळे शेतीला व शॆतकऱ्याला या देशात भविष्याचं नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.सरकार नावाच्या व्यवस्थेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.शेतकरी तरुणाचॆ माणसिक संतुलन यामुळे बिघडत आहे.
शॆतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही तर अशाचं नवनवीन समस्या भविष्यात निर्माण होउ शकतात.
आज हजारो विवाह जुळवणाऱ्या संस्था आहेत.वधु-वर सूचक केंद्र आहेत.पेपरवर पानच्या-पान स्थळांची माहिती देणारे असतात.त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटॆगरी असतात ज्यात नोकरी,व्यवसाय असतात मात्र शेतकरी ही कॅटॆगरीचं नसते.
काल-परवा अर्थसंकल्प जाहीर झाला.ज्यामध्ये शॆतकऱ्यांच्या मालाला येत्या काळात चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.सरकारने २०२२ पर्यंत तरी ही परिस्थिती सुधारावी हिचं अपेक्षा आहे.
नाहीतर यॆत्या काळात अखिल भारतीय मुंजा संघटना तयार होऊन मोर्चे निघु शकतात.जे सरकार अडचणीत आणु शकतात.
----------------------------------
✍🏻संदिप डाकॆ |Blogger
©२०१७

कौमार्य परीक्षेच्या विरोधात कंजारभाट समाजातील तरुणाईचा एल्गार!


कौमार्य परीक्षेच्या विरोधात कंजारभाट समाजातील तरुणाईचा एल्गार!
लग्नाच्या पहिल्या रात्री कंजाराभाट समाजातील पंच नवदाम्पत्याला पांढरा कपडा देतात व सकाळी त्या कपड्याचॆ परीक्षण करतात.जर रक्ताचे डाग दिसले तर मुलगी चांगली,डाग नाहीतर ती खराब म्हणून आयुष्यभर तिला नावबोटं ठेवणार.
मुलालाही तिन दिवसांचा अवधी दिल्या जातो जमलं तर ठिक नाहीतर लंगडा घोडा म्हणुन त्यालाही हिणवलॆ जाते.
मात्र या कुप्रथॆच्या विरोधात कंजारभाट समाजातील प्राजक्ता पुढे आली आहॆ.
प्राजक्तानॆ हि प्रथा राइट टु प्रायव्हसीचॆ उल्लंघन करते असे म्हटले आहे.कौमार्य परिक्षा घेण्याचा अधिकार पंचाणा कोणी दिला?
२०१८ मध्येही कापडावरील लाल डाग दाखवून कौमार्य सिद्ध कराव लागतं ही मुलींची नालस्ती नाही का? असा थेट सवाल प्राजक्तानॆ केला आहे.
या प्रथॆला विरोध करणारी प्राजक्ता हि काही पहिली नाहीए...याआधी कृष्णा इंदरॆकर व त्यांच्या पत्नींनी २२ वर्षाअाधी विरोध केला होता.कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीने त्यांना वाळीत टाकले.
विवेक तमायचॆकर,छाया तमायचॆकर यांनी सोशल मिडीयातुन याला वाचा फोडली.आज अनेक तरुण #StopVTest या मोहिमेत सामील झाले आहेत.
कौमार्य परीक्षा ही अशास्त्रीय आहे.अनॆकदा समागमाच्या नंतरही पडदा तसाचं राहू शकतो किंवा सायकलिंग,इतर गोष्टींमुळे तो फाटु शकतो.
ज्यामुळे रक्त येत नाही.त्यामुळे ही प्रथा अशास्त्रीय तर आहेचं पण नवदाम्पत्याच्या जीवनात संशय वाढवणारी  व भांडण लावणारी आहे.
त्यामुळे आपण सर्व सुशिक्षित पुरोगामी महाराष्ट्रातील तरूण प्राजक्ताच्या लढ्यात तिची साथ दॆऊया व ही प्रथा कशी चुकीची आहे याचे प्रबोधन करुया.
#StopVTest
_____________________
✍🏻संदिप डाकॆ |Blogger
©2018