जन्माचे
गावं नाही,घराचा पत्ता नाही,मतदान नाही,आधार नाही,रहीवाशी नाही,शिक्षण
नाही अशी अवस्था आहे येथील भटक्या जमातींपैकी एक असलेल्या 'डोंबारी'
समाजाची.
१९६५ ला उषा चव्हाण यांनी गायलेल्या आेळी
उद्याच्या पोटाची काळजी कशाला,
आभाळ पांघरु दगड उशाला,
गाळुनी घाम आता मागु या भाकरी।
नाचतो डोंबारी गं
नाचतो डोंबारी।।
वरील ओळी या डोंबारी समाजाचं वास्तव चित्र सांगणाऱ्या आहेत.
डोंबारी ही जमात आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगना,राजस्थान,तामीळनाडु,ओरीसा,हिमाचल प्रदेश,बांग्लादेश व महाराष्ट्रात आढळते.
डोंबारी
समाजाचा ईतीहास फारसा मिळत नाही.महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईत
डोंबारी त्यांच्या सोबत असल्याचे काही लेखी पुरावे मिळतात तर छञपती
शिवरायांच्या ईतीहासातई डोंबारी समाजाचे उल्लेख सापडतात.महाराष्ट्रात
डोंबारी राजस्थानमधुन भटकत आल्याचे बोलले जाते.डोंबारी हा सध्या तरी खेळ
करुन भिक मागुन जगणारा समाज आहे.डोंबारी समाजात मुलीचे लग्न हे बालवयातचं
केले जाते आणि हो लग्न करण्यासाठी तिला डोंबाऱ्याचे सगळे खेळ येणे
बंधनकारक असतात.जर तिला हे खेळ येत नसतील तर अशा मुलींचे लग्न सुद्धा होत
नाहीत.डोंबाऱ्याच्या घरी मुल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे
प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण
म्हणजे काय हो,६' इंचाच्या गोल रिंगमधुन संपुर्ण शरीर आत टाकणे व बाहेर
काढणे हा खेळ प्रकार करताना त्या चिमुकल्या जिवाला असह्य वेदना होतात त्या
जाणवु नये म्हणुन गावठी दारु पाजली जाते व लहान पाखरं अल्पवयातचं
व्यसनाच्या आहारी जातात.
आॅल्म्पीक मधील खेळाडुंना ही लाजवेल अशा कसरती डोंबारी समाजातील मुली करतात.
डोंबारी
समाजात एक प्रथा आहे ती म्हणजे अंघोळ न करण्याची.विशेष करुन महिलांना
वर्ष-सहा महीने अंघोळ करु दिली जात नाही ज्यामुळे महिलांच्या अंगाचा वास
येतो ज्यामुळे परपुरुष तिच्याकडे आकर्षीत होत नाही.
डोंबाऱ्याचं
बिऱ्हाड आज या गावाला तर उद्या दुसऱ्या म्हणुन या अंघोळ न करण्याच्या
प्रथेचा गावगुंडांपासुन आपली अब्रु वाचवण्यासाठी उपयोग होतो.
डोंबारी महिलांना स्वयंपाक येत नाही.ज्या गावात खेळ तिथेचं काही घरी भिक मागुण आपल्या कुटुंबाच्या पोटाची कशी-बशी आग विझवली जाते.
पुर्वी
म्हणजे आमच्या लहानपणी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धा गावं जमा होऊन हा
खेळ पहायचां.त्याच्यामध्ये रिंगमधुन शरीर बाहेर काढणे,तारेवर बांबु घेऊन
चालने,कोल्हाट उड्या मारणे,डोळ्यात सुई पकडणे अशे नानाप्रकारचे साहसी व
धाडसी खेळ दाखवले जायचे.खेळ झाल्यावर जमलेले बघे आठ आणे,रुपया व
जास्तीत-जास्त दहा रुपयं द्यायचे.माञ आता परीस्थीती बदललीयं! कालचं आमच्या
गावी खुप दिवसानंतर डोंबारी कुटुंब खेळ करण्यासाठी आले माञ त्यांना बघणारे
डोळेही कमी झाले आणि देणारे हातही.
बदलत्या
काळात हा समाज खुप पाठीमागे राहिला.या समाजाला शासनाच्या कुठल्याही
योजनेचा फायदा झाला नाही.हा समाज सुधरला पाहिजे यासाठी लातुरमधील आमचे मिञ
नरसिंग झरे यांनी प्रयत्न सुरू केले.त्यांनी सर्वप्रथम या डोंबाऱ्याना
लातुरमधील अनसर वाड्यावर स्थाईक केले.येथे त्यांना स्वयंपाक करायचे शिकवुन
डोंबारी महीलांना रोजगार मिळवुन दिला.डोंबारी पुरुषांना बॅंड पथकाचे
प्रशिक्षण देऊन व्यसनांपासुन परावृत्त केले.
डोंबारी
समाजातील मुले आता नरसिंग झरेंच्या सांगण्यावरुन शाळेत जातात.निश्चितच ही
चांगली बाब आहे.माञ आजही हा समाज न्यायापासुन वंचीत आहे.शासन या बाबतीत
उदास आहे.त्यामुळे समाज म्हणुन आपणचं येथुन पुढं त्यांच्या मदतीसाठी पुढे
यायला पाहिजे. डोंबाऱ्याचा खेळ दिसला तरं बघा आणी त्यांना मदत करा! डिजीटल
इंडीया च्या नादात आमचा गावरान इंडीया लोक विसरत चालले आहेत.
अशा
५२ जाती एकट्या महाराष्ट्रात आहेत ज्यांना अन्न,वस्ञ व निवारा
नाही,स्वतःची ओळख नाही. गायी-म्हशी सारखं बाळंतपण होतं ओ, या
माता-भगीनींचं! मगं आम्ही विकसीत झालो हे ढोल बडवणं तरी बस्स करा.
बुलेट
ट्रेन आणा हो ती श्रीमंतांच्या चैनीसाठी आवश्यक आहे परंतु खेड्यात
राहणाऱ्या वंचीत जातींना मुलभुत सुविधा तरी द्या!ते ही या देशाचे नागरीक
आहेत.(हा माञ एक नक्की आहे त्यांच्याकडे या देशाचे रहीवाशी असल्याचा एकही
पुरावा नाही माञ गायींना आधार कार्ड आहे)
✍संदीप डाके।Blogger
©२०१७
यांची कला मोठ्या टेजवर दाखवण्यासाठी यांना सहकार्य करा ही विनंती
ReplyDeleteखूपच छान लेख लिहला सर
ReplyDelete