वेश्या होण्यास भाग पाडणारी धर्म मान्य प्रथा "देवदासी"


साधारण देवदासी या शब्दाची उकल केली की असं वाटतं की,देवाची सेवा करणारी म्हणजे देवदासी!
देवदासी या प्रथेचे मुळ येथील शोषण व्यवस्था,धर्म आणी अंधश्रद्धेमध्ये आहे.पुर्वी मंदीरांमध्ये पुजाऱ्यासोबत देवाची सेवा करण्यासाठी महीला सर्रास असतं.
एखाद्याला मुल-बाळ होत नसेल तर झालेले पहीले मुल देवीला सोडु असा नवस बोलतात आणी योगायोगाने पाळणा हलला की खरोखरंच ते मुल देवीला सोडतात म्हणजे त्या मुलीचे लग्न देवीसोबत लावले जाते.देवी सोबत लग्न लागले की ती मुलगी देवदासी होते.
मुला-मुलींच्या केसात जट निघाली की अशी मुले सुद्धा देवदासी होण्यासाठी सोडली जातात.
कर्नाटक आणी महाराष्ट्रात देवदासींचे प्रमाण आधीक आहे.जवळपास ९०% देवदासी या यल्लमा देवीच्या आहेत.
यल्लमा म्हणजे रेणुका देवी.यल्लमा देवीचे महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशात बरीचं मंदीरे आहेत.त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती,कोकटनुर व शिमोगा जिल्ह्यातील चंद्रगुत्तीची यल्लमा प्रसिद्ध आहे.
चंद्रगुत्ती येथे यल्लमा देवीची पुजा करण्यासाठी "नग्नपुजा" ही देखील एक प्रथा होती.या मध्ये महिला-पुरूष नग्न होऊन याञेच्या काळात यल्लमाची पुजा करायचे.
एकदा का मुलीचे लग्न देवीसोबत लागले की ती देवदासी बनते व देवी तिची नवरा होते असा समज ही प्रथा पाळणाऱ्या लोकांचा आहे.देवदासी झाल्यानंतर देवाची सेवा करणे व भिक्षा मागुन पोट भरणे हा देवदासींचा नित्यक्रम ठरतो.देवदासी वयात आल्यानंतर तिचा "झुलवा" लावल्या जातो.
झुलवा लावणे म्हणजे तिच्या शरीराचा भोग घेण्यासाठी एखाद्या श्रीमंत किंवा सावकाराची निवड करण्यात येते.देवदासी वयात आली की,तिच्या आई-वडीलांकडे श्रीमंत व सावकार झुलवा लावण्यासाठी आग्रह धरतात.त्याबदल्यात रक्कम,सोने,राशन व तिला निट सांभाळण्याचे वचन देतात.
झुलवा लावण्याच्या दिवशी संपूर्ण गावाला जेवन दिले जाते.'झुलवा' लावण्यासाठी लग्नासारखा मांडव घातला जातो.मांडवात झुलवा लावुन घेणारा व्यक्ती देवदासीला मांडीवर घेऊन बसतो व विधी केल्या जातो.त्या दिवसापासुन देवदासी त्या श्रीमंत व्यक्तीची होते.यालाचं म्हणतात झुलवा लावणे!
झुलवा लावल्यानंतर तिचा फक्त उपभोग घेतल्या जातो.तीला संपत्तीवर अधिकार मिळत नाही तसेचं झुलवा लावुन घेणाऱ्याने तिला आयुष्यभर सांभाळावे असे कुठलेही बंधन नसते.त्यामुळे देवदासींच्या तारुण्याचा उपभोग घेऊन मुला-बाळांसकट तिला सोडुन दिल्या जाते.
देवदासीला सोडुन दिल्यानंतर तिच्याकडे जोगव्याशिवाय पर्याय उरत नाही.माञ नुसत्या जोगव्यावर तिचा उदरनिर्वाह चालत नाही.अशा प्रकारे देवदासीला पैसा मिळवण्यासाठी शहरातील वेश्या-व्यवसायाकडे जावे लागते.आजही वेश्या-व्यवसाय करणाऱ्या महिलांपैकी जास्त महिला देवदासी प्रथेतुन आल्या आहेत.
देवदासी म्हणुन सोडलेली मुलं ज्यांना जोग्या किंवा जोगटा म्हटले त्यांची परीस्थीती यापेक्षा वेगळी नाही.ते सुद्धा वेश्या-व्यवसायात दलाल म्हणुन काम करतात.
स्वातंञ्यानंतर जवळपास दोन लाख महिला देव-देवतांना सोडण्यात आल्या आहेत.
आज देवदासी प्रथेवर कायदेशीर बंदी आहे.तरीही हि प्रथा काही भागात चोरुन-लपुन पाळली जाते.९ जुलै २०१७ ला कर्नाटक मध्ये आई-वडीलांना स्वतःच्या मुलीला देवदासी होण्यासाठी भाग पाडले यावरुन अटक करण्यात आली आहे.
देवदासी हि प्रथा एक प्रकारे मानवी अधीकारांच उल्लंघन,महिलांच शोषण व देवदासी झालेल्या मुलींना वेश्या होण्यास भाग पाडणारी धर्ममान्य प्रथा आहे.अनेकांनी हि प्रथा बंद करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले आहे त्यांना कमी-अधीक प्रमाणात यशही आले परंतु आधुनिक काळात सुद्धा देवदासी अस्तित्वात आहे.त्याचे कारण येथील लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा व धार्मिक विचारांचा पगडा!

हसऱ्या चेहऱ्या मागचं दु:ख!


तमाशा पार्टीत नाचनाऱ्या मुलींकडे पाहुन असं वाटतं किती आनंदी जिवन जगतात या मुली.त्यांच्या चेहऱ्यावरील हाव-भाव पाहुन कोणालाही वाटणार नाही यांचा जिवन प्रवास एवढा खडतर असेल.
इथं स्वखुशीने क्वचित परंतु मजबुरीनेचं नाचण्यासाठी यावं लागतं. ती मजबुरी असते पोट,ती मजबुरी असते जात.डोंबारी वा कोल्हाटी जातीत जन्म घेतला की खेळा-बागडायच्या वयात पायामध्ये छम-छम वाजणारे चाळ बांधले जातात.सुंदर जन्माला येणं इथं जणु शाप आहे.कारण कुरूप मुलींचे लग्न लावली जातात आणि सुंदर मुली नाचण्यासाठी पाठवली जातात.
महाराष्ट्राची लावणी प्रसिद्ध आहे ओ, परंतु लावणीवर नाचणाऱ्या मुलींचं दु:ख कधी दिसलं नाही.तीला कलाकार वा नटी म्हणुन समाजाने मान्यता कधी दिलीचं नाही.त्यांच्याकडे नेहमी वाईट नजरचं समाजाने दिली.
नाचतं जरी असली तरी तिलाही वाटतं आपलं प्रेम व्हावं,लग्न करावं,संसार करावा पण प्रेम करणं तिच्यासाठी गुन्हा आहे.खोटी आश्वासन,स्वप्न दाखवुन तिचा विश्वास घात करतात.रस आहे तो पर्यंत तीचा उपभोग घेऊन तिला एकटीला तिच्या पोटातील जिवासोबतं सोडुन निघुन जातात.
नाईलाजाने तिला त्या तान्ह्या बाळाला घेऊन पायात चाळ बांधुन पुन्हा स्टेजवर नाचावं लागतं.पुढे ती नाचतं असते आणि मागे ते बाळ आईच्या दुधासाठी रडतं असतं.आम्ही तमाशाला गेल्यावर तिचं नृत्य पाहण्याऐवजी तिच्या शरीराच्या दुसऱ्या अंगाकडेचं बघत असतो...कोणी तिला डोळा मारतं तरं कोणी .....'किती घेईल रं....?' म्हणुन तिचा सौदा करण्यासाठी तयार असतातं.
एवढं सगळं असुनही ती आपले दुःख विसरुन,आपल्या काळजाचा तुकडा बाजुला ठेवुन नाचते व नाचताना सांगते सुद्धा,
"पोटासाठी नाचते मी,पर्वा कुणाची"

परंतु आम्ही संवेदनाशुन्य झालो आहोत आम्हाला तिच्या भावना कधी समजल्या नाहीत.
तिलाही वाटतं ज्या हाल-अपेष्ठा आपल्या जिवनात आल्या त्या माझ्या मुलांच्या जिवनात येऊ नयेत म्हणुन ती शिकवायचा प्रयत्न करते तरं अनौरस अवलाद,ठेवल्यालीचं,नाचनारनीचं म्हणुन समाज हिनवायला तयारं.
मग परत पुन्हा तोचं प्रवास मुलगा असला तर ढोल,ढोलकी वाजवणारं आणी मुलगी असली की नाचायला लावणारं,
ति तीचे दु:ख विसरून खोटं हसु चेहऱ्यावर आणुन नाचणार आणी आम्ही समोर बसुन डोळा मारणारं तर कोणी तिच्या शरीरावर लक्ष देणारं परंतु तिला कलाकार म्हणुन माण्यता देणार नाही.
ती अंगावर नऊवार घालुन नाचते,चारीञ्य जपण्याचा प्रयत्न करते तरी तिला आम्ही उपेक्षीत ठेवण हिचं आमची संस्कृती आणी परंपरा आहे का?

लैंगीक शिक्षण देणारी खजुराओ मंदिरं!


खजुराओ मंदीराबद्दल आजही मुक्तपणे बोलल्या जात नाही.अनेक ईतिहासकार,विचारवंत खजुराओ विषयापासुन पळ काढतात. खजुराओ म्हणजे अश्लिलतेचा कळसं आहे.त्यामुळे ह्या मंदीरावरील शिल्प मातीने लिंपुन काढा अशी मतं अनेकांनी मांडली आहेत.
पण खरचं ही खजुराओ च्या मंदीरावरील शिल्प अश्लिल आहेत की लैंगीक शिक्षण देणारी आहेत हे उघड्या डोळ्याने बघणं गरजेचं आहे.
धर्माचा चष्मा लावणारांनी कामक्रीडेवर उघड बोलणं नेहमीचं अश्लिल माणलं आहे.इतकचं काय तर कामवासना योग्य नाही अशी देखील मतं मांडली आहेत.परंतु ही मतं मांडणारी माणसं एक वास्तव विसरतात की त्यांचा सुद्धा जन्म कामवासनेमुळेचं झालायं.
गुहांमध्ये राहणा-या आपल्या पुर्वजांनी कामवासना टाळली असती तर आज आमची पिढी दिसली नसती.
खजुराओ येथील शिल्प हे हजारो वर्षापासुन आपलं अस्तित्व टिकुन आहेत.त्यांची निर्मिती विशीष्ठ उद्देशाने केली आहे.त्या काळातीलं माणव हा शिवलींगाची(शिवाचे लिंग) पुजा करायचा.खजुराओ मंदीरातील सर्वात प्रसिद्ध कंदरीया महादेव मंदीरावरचं ही कामक्रीडा,कामवासना,मैथुन करणारी शिल्प आहेत.या मंदीरातील गर्भगृहात संगमरवरी शिवलींग आहे.
खजुराओ येथील हे शिल्प बघताना कुठेही अश्लिलता दिसत नाही दिसते ती फक्त माणवाची नैसर्गिक क्रिया.
फरक आहे तो आपल्या नजरेमध्ये.भारतामध्ये ताजमहाल नंतर जास्त पर्यटक खजुराओ येथील मंदिर पाहतात.शैक्षणीक अभ्यासक्रमात खजुराओ चा उल्लेख फार कमी येतो.
खजुराओ चा युनेस्कोच्या world heritage site मध्ये समावेश केला आहे.ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
हजारो वर्षापुर्वी आपले पुर्वज लैंगीक शिक्षणासाठी आग्रही होते हेचं जणु त्या आखीव-रेखीव शिल्पांना सांगायचयं.
संदिप डाके । Blogger
©sandip dake 2017