भारतामध्ये जवळपास ३५५ मिलीयन महिलांना मासीक पाळी येते.त्यापैकी १२% महिला या सॅनीटरी नॅपकीन वापरतात.बरं ज्या महिला या वापरतात त्यातील बर्याच महिला दुकानावर,मेडीकल किंवा मॉलमध्ये सॅनीटरी नॅपकीन खरेदी करताना तोंडातुन शब्द सुद्धा काढत नाहीत फक्त हाताने खुन करतात.हे तर काहीचं नाही ग्रामीण भागात ज्या बोटावर मोजता येतील एवढ्या महिला सॅनीटरी नॅपकीन वापरतात त्यांची खरेदी पुरुष करतात.दुकानदार त्या सॅनीटरी नॅपकीनला रद्दीमध्ये गुंडाळुन दोरा मारुन देतो.
हे आहे आमच्या देशातील वास्तव चित्र.
|
स्रोत:इंटरनेट |
आजही आमच्या देशातील महिला मुलभुत गरजांपासुन वंचित आहेत.सॅनीटरी नॅपकीन या आजही भारतात लक्जरी वस्तुंमध्ये मोडतात.म्हणजे फक्त श्रीमंत लोकचं याचा वापर करतात.
आता GST मध्ये त्या नॅपकीनवर १२% टॅक्स लावला जाणार आहे आणि सिंदुर,बांगड्या या GST मधुन वगळल्या आहेत.म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की सरकारची माणसीकता काय आहे.
सुष्मीता देव यांनी अरुण जेटली यांना पञ लिहुन सॅनीटरी नॅपकीन GST मधुन वगळा असा प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय मंञी मनेका गांधी यांनी सुद्धा सॅनीटरी नॅपकीन टॅक्स मुक्त करा अशी मागणी केली परंतु त्याला यश आले नाही.
प्रश्न आधीच्या सरकारने काय केले याचा नाही त्यांनी नाही केले म्हणुन त्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला.
भारतामध्ये सॅनीटरी नॅपकीन वापरासंदर्भात प्रबोधणाची गरज आहे.अनेक मुली मासीक पाळीमुळे शाळा,कॉलेजमध्ये येत नाहीत.त्यामुळे भारताला महासत्ता जरुर बनवा,मेक इन ईंडीया करा,शायनींग इंडिया,डिजीटल इंडिया करा पण त्याआधी सॅनीटरी नॅपकीन टॅक्स मुक्त करुन सॅनीटरी नॅपकीन वापराचे प्रमाण १००% करा.
"ती आणि तुम्ही काही वेगळे नाहीत.निसर्गाने तीला निर्मीतीक्षम बनवलं आहे.तीच्या मासीक पाळीच्या काळातील वेदना तिलाचं माहित.परंतु माणुस म्हणुन तिची वेदना समजुन तिच्या सोबत उभे रहा तिच्या या मुलभुत गरजांच्या लढ्यात"
#सॅनीटरी नॅपकीन #ती आणि #तिची मासीक पाळी!
©संदीप डाके मो.नं.9146357743