Harry Potter:हॅरी पॉटरची २० वर्षे


२००१ ला हॅरी पॉटर अॅंड द फिलॉसॉफर्स स्टोन हा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि त्याने जगाला भुरळ घातली.त्यानंतर सगळेचं हॅरी पॉटर ह्या चित्रपटाच्या संबंधित माहिती घेऊ लागले आणि कळालं हा चित्रपट जे.के.रोलींग यांची कादंबरी जी २६ जुनला प्रकाशित करण्यात आली होती तिच्यावर आधारित आहे.
आज हॅरी पॉटरला २० वर्षे होत आहेत.अत्यंत रोमांचक व उत्सुकता तेवत ठेवणारी ही हॅरी पॉटरची श्रृंखला.जे के रोलींग यांच्या हॅरी पॉटर या पाञावर आधारीत एकुण सात कादंबर्या त्यावर एकुण आठ चित्रपट.या संपूर्ण चित्रपटात हॅरी पॉटर,हर्माईनी ग्रेंजर आणि रॉन विज्ली हि महत्वाची व सर्वांना आवडणारी पाञे.
तगडा पैसा कमावणा-या जागतीक चित्रपटांमध्ये हॅरी पॉटरचा नंबर लागतो.२००१ नंतर एका पाठो-पाठ हे आठ चित्रपट प्रदर्शीत झाले.आजही हॅरी पॉटरची क्रेझ कमी झालेली नाही.
आता जे.के.रोलींग यांची प्रेक्षकांसाठी फनटॅस्टीक बीट्स अॅंड व्हेअर टु फाईंड देम ह्या नवीन सिरीज मधील २०१६ ला एक चित्रपट प्रदर्शीत झाला.ही सिरीज देखील भुरळ घालणारी व जादुई दुनियेची सफर घडवणारी आहे.
आज हॅरी पाॅटरला २० वर्षे पुर्ण झाली त्याबद्दल टिम व जे.के.रोलींग यांचे अभिनंदन!
©संदीप डाके ९१४६३५७७४३

No comments:

Post a Comment