|
बारव
|
होय...आपल्या मराठवाड्यात प्राचीन मंदीरांच गाव आहे.(Village of Temple)जिथे ३६० मंदीरं होती.धक्का बसलाना हे ऐकुन.पण हे खरं आहे.
परभणी जिल्ह्यातील चारठाणा हे जिंतुर तालुक्यातील सगळ्यात मोठे गावं.परभणी वरुन ७५ कि.मी व जालण्यावरुन ८२ कि.मी अंतरावर असलेले चारठाणा हे गाव आता Village Of Temple म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे.
आमच्या Incredible Marathwada या मोहीमेची सुरुवात आम्ही चारठाणा पासुन सुरु केली आहे.या मोहीमे अंतर्गत मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळे जगातील पर्यटकांच्या नकाशावर आणने हा आमचा उद्देश आहे.या मोहीमेसंदर्भात एक स्वतंत्र ब्लॉग लिहुन या मोहीमेची माहिती दिली जाईल.
|
Charthana Entrance Gate |
कालचं आम्ही चारठाणा येथे जाऊन येथील वारसास्थळांची पाहणी केली.येथे गेल्यानंतर आमची भेट झाली ती संतोष दुकानदार यांच्याशी संतोष हे पुरातत्व खात्यात केअर टेकर म्हणुन काम करतात.त्यांनी आम्हाला बोलताना सांगितले की,"चारठाण्यात एकुण पुर्वी ३६० मंदिरे होती.त्यापैकी आता गोकुळेश्वर,खुराची देवी,जोडमहादेव,गणपती आणि महादेव,उकंडेश्वर व नृसिंह तिर्थ ही मंदिरे असुन बारव(पुष्कर्णी) व दिपस्तंभ ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.तसेचं दोन नविण शिवलींग मंदिरं उत्खणनात सापडल्याचेही सांगितले.त्यांनी आम्हाला वरील ठिकाणांची प्राथमिक माहिती देऊन या स्थळांना जाण्याचा मार्ग दाखवला.(वरील प्रेक्षणीय स्थळं गुगल मॅपवर आहेत)आणि सुरु झाला आमचा प्रवास Village Of Temple चा.
सुरुवातीला आम्ही रेणुका देवी मंदीर म्हणजे स्थानिक लोक जिला खुराची देवी म्हणतात तिथे गेलो.मंदीराच्या आत मुख्य प्रवेशद्वारातुन प्रवेश केला तेव्हा अवाक् झालो ते
या मंदीराचे छत(Sealing) बघुनं.शिल्पकलेचा वापर करुन अत्यंत सुंदर,सुबक
दगडाला कोरुन बनवलेली छत जी दगडाला तासुन एकमेकांत फसवलेली आहेत.यावरुन ती निश्चितचं यादवकालीन हेमाडपंती असावीत असे वाटते.हेमाडपंती
स्थापत्य शास्ञात कमीत-कमी चुण्याचा वापर व जास्तीत-जास्त दगडं तासुन
एकमेकांत फसवले जातात.याचं छतावरील
नक्षीकामावरुन या देवीला "खुराची देवी"
म्हणतात.कारण स्थानिकांच्या नजरेतुन हे नक्षीकाम जनावरांच्या खुरेसारखे
आहे.मंदीराच्या गर्भगृहात रेणुका देवीचे शिर आहे.मंदीरातील खांबावर विवीध
शिल्प कोरलेले आहेत.हत्ती,सिंह,व्याल,अप्सरा,नाग व काही प्रसंग चित्र
पहावयास मिळतात.एकंदरीत मंदीराची पाहणी केल्यानंतर मुळ मंदीर रेणुका
देवीचे आहे का याबद्दल शंका निर्माण होते.
हे मंदीर पाहील्यानंतर आम्ही गेलो ते जोडमहादेव मंदीरात.रेणुका देवी
मंदीराच्या पाठीमागेचं हे मंदीर आहे.आहे.हे देखील मंदीर हेमाडपंती स्थापत्य
शैलीतील आहे.याठिकाणी दोन शिवलींग आहेत.मंदीराची छत देखील आकर्षक
आहे.येथील खांबावर नाग व व्याल शिल्प आहे.गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर
वरच्या बाजुस गणपती व खालच्या बाजुस हत्ती व व्याल शिल्प आहे.गर्भगृहातील
शिवलींग पिंडीवर एका बाजुस गोमुख आहे.येथील गर्भगृह साधारण पाच फुट खोल आहे
व शिवलींग आकाराने मोठे आहे.या मंदीराला दोन मुख्य द्वार आहेत.या मंदीराचे
संवर्धनाचे काम झाले आहे.
हे दोन मंदीर पाहील्यानंतर आमचा उत्साह वाढला व इतर मंदीरात आता काय-काय
नविण बघायला मिळणार याची उत्सुकता ही वाढली.यानंतर आम्ही गेलो गोकुळेश्वर
मंदीरामध्ये.येथील प्रवेशद्वार शिल्पांनी व नक्षीकामाने भरुन
आहे.प्रवेशद्वारावरील खांबावर दोन्ही बाजुंनी अप्सरा व बहुधा अष्टमातृका
आहेत.तसेच खांबाच्या मध्यभागी काही प्रसंग कोरलेले आहेत.या मंदीराला हे
एकचं द्वार आहे.मंदीरामधील भजनमंडपाच्या दोन्ही बाजुला दोन छोटी गर्भगृहे
आहेत व एक मुख्य गर्भगृह जिथे शिवलींग आहे.गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या
वरच्या बाजुस गणपती व खालच्या बाजुस व्याल आहेत.येथील व्यालशिल्प थोडे
वेगळे आहे.भजनमंडपाच्या खांबावर नाग आहेत.आम्ही गर्भगृहात प्रवेश करुन
येथील भिंतीची पाहणी केली त्यावर एक चिन्ह आमच्या निदर्शनास आले.हे चिन्ह
आहे की एखाद्या भाषेचा शब्द हे माञ तपासुन पहावे लागेल.
गोकुळेश्वर मंदीराच्या बाजुलाचं येथील महत्वाचं आकर्षण ठरलेली बारव
आहे.जिला पुष्करणी असे म्हणतात.मंदीर बघीतल्यानंतर आमची नजर गेली ती या
बारवेवर.अत्यंत भव्य व डोळ्याचे पारणे फेडणारी ही बारव आहे.या बारवेला दोन
मुख्य द्वार आहेत व एका द्वाराची निर्मीती अलिकडच्या काळात झाली असावी असे
निरीक्षणातुन लक्षात येते.पायऱ्या उतरुन आम्ही बारवात प्रवेश
केला.बारवाच्या चहुबाजुंनी मंडप आहे.एकुण २४ खांबावर हा मंडप होता.माञ
उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरील ४ खांब पडल्यामुळे तेथील मंडप सध्या
अस्तित्वात नाही माञ खांब त्यांच्या जागेवर पडलेले आहेत.येथील खांबाच्या
वरच्या बाजुस नाग आहेत व काही खांबांच्या मध्य भागी व्याल शिल्प
आहेत.चहुबाजुंनी असलेल्या मंडपाच्या भिंतीवर २७ देवळ्या आहेत.तसेचं
पुर्व-पश्चिम मंडपात बारवेच्या मधोमध दोन खोल्या आहेत.यातील पश्चिम
खोलीमध्ये एक रहस्यमय वाटणारी देवळी आहे.तसेचं या परीसरात भुयार असल्याचे
स्थानिक सांगतात.येथील बारवेत सध्या हिरवट पाणी आहे.पाण्याने बारव पुर्ण
भरलेली आढळुन आली.आम्ही बारव पाहत असताना काही स्थानिक महिला पाणी नेत
होत्या यावरुन या पाण्याचा वापर होतो हे आपल्याला समजते.बारवेच्या दक्षिण
द्वारातुन आम्ही वर आलो तेव्हा समोर याच शैलीतील वास्तु दिसली.माञ तिथे
कुलुप असल्यामुळे बाहेरुनचं तिचे निरीक्षण केले तेव्हा ती मंदीर नसावी असा
आमचा अंदाज आहे.माञ या वास्तुच्या समोर अनेक शिल्प अस्ताव्यस्त अवस्थेत
दिसुन आली.यात प्रामुख्याने शिवलींग पडलेली दिसतात व याच्या वर पुरातत्व
खात्याची पाटी.हि वास्तु बघुन आम्ही परत गोकुळेश्वर मंदीराच्या
प्रवेशद्वारावर आलो तेव्हा प्रवेशद्वाराच्या समोरील भागात नंदी व शिवलींग
दिसले.येथेही अनेक शिवलींग,शिळा,शिल्प अस्ताव्यस्त पडलेली दिसुन आली.येथुन
थोडे समोर आल्यानंतर आम्हाला ढासळलेला एक बुरुज दिसला व आमचा पुढचा प्रवास
नृसिंह तिर्थ येथे जाण्याचा सुरु झाला.
(...क्रमश)
|
Sclupture On Pillar at Renuka Temple |
|
Sclupture On Pillar at Renuka Temple |
|
Narsimha at Renuka Temple |
|
Jodmahadev Shivlinga(2) |
|
Sealing of Renuka Temple |
|
Sclupture On Pillar at Renuka Temple |
|
Sclupture |
|
Sclupture |
|
Sealing of Renuka Temple |
|
Renuka Temple(khurachi devi) |
|
Apsara at Renuka Temple |
|
Jodmahadev Temple |
|
Elephant sclupture |
|
Jodmahadev Temple Garbhgruha entrance sclupture |
|
Jodmahadev Shivlina (1) |
|
Elephant Sclupture |
|
vyal at Jodmahadev |
|
stone sclupture beside Renuka Temple |
|
Jodmahadev Temple Entrance Gate |
|
Sclupture On Pillar at Renuka Temple |
|
Sclupture On Pillar at Renuka Temple |
|
Sclupture On Pillar at Renuka Temple |
|
Sealing Of Renuka Temple(khurachi devi) |
|
Renuka Temple(Khurachi Devi) |
|
Sealing of Gokuleshwara Temple |
|
Gokuleshwara Temple |
|
Gokuleshwar Shivlinga |
|
Unknown Sign on Wall Of Gokuleshwar GarbhGruha |
|
Unknown Sign on Wall Of Gokuleshwar GarbhGruha |
|
Gokuleshwar Mandap |
|
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana |
|
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana |
|
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana |
|
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana |
|
Pillars of Entrance gate At Gokuleshwar Temple |
|
Entrance Gate of Gokuleshwar Temple,Charthana |
|
Barav(pushkarni) |
|
Barav(pushkarni) |
|
Barav(pushkarni) |
|
Barav(pushkarni) |
|
Barav(pushkarni) |
|
Pushkarni Barav |
|
Barav Devli |
|
Barav(Pushkarni) |
|
Pillars of Barav(pushkarni) |
|
Vyal Stone Sculpture On Pillar at Barav(Pushkarni) |
|
Unknown At Gokuleshwar Temple |
|
Gomukh At Jodmahadev Temple |
|
Gomukh At jodmahadev temple |
Very nice Histological place of maharashtra.
ReplyDeleteThank You Sir
Deleteसुंदर ...
ReplyDeleteThank You Sir
Deleteदिपस्थंभ नसुन मानसस्थंब आहे.
ReplyDeletegood
ReplyDeleteखूपच सुंदर काका
ReplyDeleteखुपच सुंदर...!, मी पाहिले आहे हे सर्व..
ReplyDeleteधन्यवाद डाके साहेब, तुम्ही आमच्या गावाचा हा ऐतिहासिक ठेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जात आहात.... महाराष्ट्र तर दूरच, पण परभणी जिल्ह्यातील सुद्धा बहुसंख्य जनता देखील ह्या ऐतिहासिक वारसा स्थळांपासून अनभिज्ञ आहेत... सरकार दरबारी जर हे पोचले, तर गावामध्ये विकसित होण्याची मोठी क्षमता आहे...आपले प्रयत्न स्तुत्य आहेत... धन्यवाद... डॉ. अभिजीत देशपांडे चारठाणकर...
ReplyDeleteधन्यवाद डाके साहेब, तुम्ही आमच्या गावाचा हा ऐतिहासिक ठेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जात आहात.... महाराष्ट्र तर दूरच, पण परभणी जिल्ह्यातील सुद्धा बहुसंख्य जनता देखील ह्या ऐतिहासिक वारसा स्थळांपासून अनभिज्ञ आहे... सरकार दरबारी जर हे पोचले, तर गावामध्ये विकसित होण्याची मोठी क्षमता आहे...आपले प्रयत्न स्तुत्य आहेत... धन्यवाद... डॉ. अभिजीत देशपांडे चारठाणकर...
ReplyDeleteखुप सुंदर आहे मंदिर
ReplyDeleteIt's good historical places but so many people who have not yet received any information about this ....Thank you to provide information of incredible Marthawada...it's good..
ReplyDeleteअप्रतिम...!
ReplyDeleteकृपया चारथना गाव कोणत्या तालिका zilayat येते ते सांगावे/edit करावे, आणी route कसा जाण्यासाठी
ReplyDeleteCharthana Tq,Jintur Dist,Parbhani it is Mentioned in Blog.
Deleteyour Comment is Important for us.
Thank You!
ता. जिंतूर, जिल्हा परभणी...
DeleteCharthana is famous as it was a center in Nizam period. There was four thanas in all four directions .Hence named as Charthana. Proud to be a charthankar. R V Deshpande.
ReplyDeleteआपण कुठे राहता चारठाणला...??
DeleteCharthana is famous as it was a center in Nizam period. There was four thanas in all four directions .Hence named as Charthana. Proud to be a charthankar. R V Deshpande.
ReplyDelete