कौमार्य परीक्षेच्या विरोधात कंजारभाट समाजातील तरुणाईचा एल्गार!
कौमार्य परीक्षेच्या विरोधात कंजारभाट समाजातील तरुणाईचा एल्गार!
लग्नाच्या पहिल्या रात्री कंजाराभाट समाजातील पंच नवदाम्पत्याला पांढरा कपडा देतात व सकाळी त्या कपड्याचॆ परीक्षण करतात.जर रक्ताचे डाग दिसले तर मुलगी चांगली,डाग नाहीतर ती खराब म्हणून आयुष्यभर तिला नावबोटं ठेवणार.
मुलालाही तिन दिवसांचा अवधी दिल्या जातो जमलं तर ठिक नाहीतर लंगडा घोडा म्हणुन त्यालाही हिणवलॆ जाते.
मात्र या कुप्रथॆच्या विरोधात कंजारभाट समाजातील प्राजक्ता पुढे आली आहॆ.
प्राजक्तानॆ हि प्रथा राइट टु प्रायव्हसीचॆ उल्लंघन करते असे म्हटले आहे.कौमार्य परिक्षा घेण्याचा अधिकार पंचाणा कोणी दिला?
२०१८ मध्येही कापडावरील लाल डाग दाखवून कौमार्य सिद्ध कराव लागतं ही मुलींची नालस्ती नाही का? असा थेट सवाल प्राजक्तानॆ केला आहे.
या प्रथॆला विरोध करणारी प्राजक्ता हि काही पहिली नाहीए...याआधी कृष्णा इंदरॆकर व त्यांच्या पत्नींनी २२ वर्षाअाधी विरोध केला होता.कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीने त्यांना वाळीत टाकले.
विवेक तमायचॆकर,छाया तमायचॆकर यांनी सोशल मिडीयातुन याला वाचा फोडली.आज अनेक तरुण #StopVTest या मोहिमेत सामील झाले आहेत.
कौमार्य परीक्षा ही अशास्त्रीय आहे.अनॆकदा समागमाच्या नंतरही पडदा तसाचं राहू शकतो किंवा सायकलिंग,इतर गोष्टींमुळे तो फाटु शकतो.
ज्यामुळे रक्त येत नाही.त्यामुळे ही प्रथा अशास्त्रीय तर आहेचं पण नवदाम्पत्याच्या जीवनात संशय वाढवणारी व भांडण लावणारी आहे.
त्यामुळे आपण सर्व सुशिक्षित पुरोगामी महाराष्ट्रातील तरूण प्राजक्ताच्या लढ्यात तिची साथ दॆऊया व ही प्रथा कशी चुकीची आहे याचे प्रबोधन करुया.
#StopVTest
_____________________
✍🏻संदिप डाकॆ |Blogger
©2018
Subscribe to:
Posts (Atom)
-
जन्माचे गावं नाही,घराचा पत्ता नाही,मतदान नाही,आधार नाही,रहीवाशी नाही,शिक्षण नाही अशी अवस्था आहे येथील भटक्या जमातींपैकी एक असलेल्या ...
-
बारव होय...आपल्या मराठवाड्यात प्राचीन मंदीरांच गाव आहे.(Village of Temple) जिथे ३६० मंदीरं होती.धक्का बसलाना हे ऐकुन.पण हे खरं आहे...
-
Pingaleshwar Mahadev Temple(Shivlinga Temple) परभणी पासुन १० कि.मी अंतरावर पिंगळी हे गाव आहे.पिंगळी स्टेशन म्हणुन सुद्धा हे गाव ओळखले ज...