शिक्षण माणसाला माणूस बनवतं.माणूस पैशाने कितीही मोठा असला तरी तो ओळखला जातो त्याच्या ज्ञानाने.ज्ञानदान हे पूर्वी पवित्र कार्य माणलं जायचं,पण आज या आधुनिक युगात ते केवळ अाणी कॆवळं पैसा कमावण्याचॆ साधन बनले आहे.मराठी हि आमची मातृ भाषा.मराठी शाळांतच आम्ही भाषिक विषयांच ज्ञान प्राप्त केलं त्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागली नाही.जि.प शाळा ते शिवाजी विधी महाविद्यालय हा प्रवास झाला.इंग्रजी हा विषय शाळेत समजून घेतल्यानंतर पुन्हा त्याला वेगळं अभ्यासायची वेळ पडली नाही.पण आज २०२१ मध्ये शिक्षणाचा बाजार सामाण्य माणसाचे कंबरडे मोडणारा आहॆ.इंग्रजी हि जागतिक भाषा समजली जाते तिला आपला विरोध नाही पण इंग्रजी शिकण्यासाठी घेतले जाणारे मुल्यं अनेकांच्या पोटाला चिमटा घॆणारॆ आहॆ.
२०१७ सालची बातमी होती १३०० मराठी शाळा बंद होणार,झाल्या.२०१९ मध्ये ५००० च्या वरती आकडा गॆला.मागच्या पंधरा वर्षात एकट्या मुंबईत २२१ अनुदानीत मराठी शाळा बंद झाल्या आहॆत.यामागे कमी पटसंख्या,दोन लगत असणाऱ्या शाळा,गुणवत्ता इत्यादी कारणे देऊन या शाळांना टाळॆ लावण्यात आले आहेत.पण पडद्या मागची कहाणी थोडी वेगळी आहे.
मराठी शिक्षण हे मोफत आहे.
त्या अनुषंगाने शिक्षणाला व्यवसाय समजणाऱ्या लोकांनी गांव तिथं शिक्षण संस्थां निर्माण करुन शासन अनुदान प्राप्त करुण घेतले.प्रचार असा केला की जिल्हा परिषद शाळांपेक्षा खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात.हा प्रयोग यशस्वी झाला.जिल्हा परिषद शाळांना पालक वर्ग नजरांदाज करु लागला.खाजगी शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांनी पैशाचा अपव्यवहार करत करोडोंची माया जमा केली.एकीकडे माया जमा झाली आणी दुसरीकडे कमी होत गेली.
आज प्रशासनाचाचं पैसा वापरून या लोकांनी इंग्रजी शाळांच मार्केटिंग करून पालक वर्गाच्या डोक्यात पक्क भुत बसवलयं की भविष्य फक्त इंग्रजी मध्येचं आहॆ.लाखोंच्या फिस,ड्रॆसकोड,डिजिटल साधणं हे चक्रव्यूह असं तयार केलयं की एखादा यात फसला की परत बाहेरचा मार्ग नाही.
आपली मायबोली,राजभाषा आणी नंतर इंग्रजी अशी सुसंगत शिक्षण पद्धती पालकांनी निवडणं गरजॆचं पण आज शिक्षणातून इंग्रजी अट्टाहास पाल्यांना अर्थहिन शिक्षण देणारा ठरणार आहॆ.
आजही आपल्याकडॆ शिक्षण हे केवळ नौकरी मिळावी म्हणून घेतल्या जाते.पण मागच्या पाच वर्षात शिक्षण व्यवस्थॆतुन करोडोंमध्यॆ बाहेर पडणारे बेरोजगार नौकरीच्या प्रतीक्षेत आहॆत ? काहींनी कंटाळून आत्महत्या केल्या...काहींनी शिक्षणाचा वापर करुन पोट भरण्यासाठी गैरव्यवहार केले...काही गुन्हेगारी क्षॆञात उतरले तर काहींनी हाताला पडेल ते काम करुन उदरनिर्वाह भागवला.
मराठी शाळेतला विद्यार्थी हा शेतात एकवॆळॆसं पाहिजे ते काम करुन पोट भरेल पण इंग्रजी माध्यमात शिकुन मोबाइल व मोटारसायकल वापरणारा विद्यार्थी भविष्यात हार्ड काम करेल हि अपेक्षा नाही.जागतीकीकरणाचा भारताला काय फायदा झाला हे नंतर तपासु पण इंग्रजी शिकवुन त्यांनी मोठा ग्राहक वर्ग भारतात तयार कॆलायं.ज्याचा फायदा पाश्चिमात्य देश करुन घॆत आहॆत.
शिक्षणं जर नौकरी मिळवण्यासाठी म्हणून घॆतलं जात असॆल तर,माध्यम कोणतही असू द्या बॆरोजगारचं बाहेर पडणार आणी पडत राहतील.दहा वर्ष इंग्रजी माध्यमाचं शिक्षण किमाण दस लक्ष घालवणारं आहॆ जे वाढत्या महागाई सोबत वाढतचं
जाणारं एवढा अट्टाहास करुण बॆरोजगारी पदरात पडणार असेल तर सामाण्य,मध्यमवर्गीय लोकांनी या मायाजाळात न सापडलॆलचं बरं!