राष्ट्रमाता जीजाऊ
स्वराज का निर्माण कराने
उसने हुंकार भरी थी।
वह राष्ट्रमाता,राजमाता
वीरमाता जीजाऊ थी।।
सुनो भारत के वीर सपूतो
गाथा सुनाऊ स्वराज जननी की।
राष्ट्रमाता,राजमाता
वीरमाता जीजाऊ की।।
सन १५९८ मे म्हालसाराणी की
कोख से जन्म हुआ जीजाऊ का।
सिंदखेड मे हाती से मिठाई बांटी
लखुजीराजे नाम शूर पिताजीका।।
हातो मे तलवार लेकर वह
बचपन मे खेली थी।
युध्दशास्ञ की नीती उन्होंने
बचपन मे ही सीखी थी।।
सत्ता संघर्ष की लडा़ई मे
मरते मिटते मराठा थे।
जीत का जश्न मनाने वाले
क्रुर मुगली राजा थे।।
अपने लोगों का खुन देख कर
खौल उठी जीजाऊ।
संकल्प किया मन में उन्होंने
इस भुमि पर स्वराज का केसरिया लहराऊ।।
शूरवीर शहाजी राजे से
ब्याह हुआ जीजाऊ का।
दोनों ने ही दृढ़ निश्चय किया
स्वराज के निर्माण का।।
सब तरफ था अंधकार छाया
नही थी उम्मीद की किरण।
पुरे हिंदुस्तान मे छाया था
मुगलो का जुलमी शासन।।
करने इस स्वराज का निर्माण
शिवनेरी पर सुर्योदय हुआ।
जीजाऊ की पावन कोख से
शिवाजी का जन्म हुआ।।
युध्द,नीती,दंड,विधान सीखा के
शिवबा को तैयार किया।
पुना की शापित धरती पर
सोने का हल चला दिया।।
देख कर इस स्वराज का निर्माण
माटी के पुञ जाग गये।
खेती कर के लड़ने वह
स्वराज का मावला बन गये।।
जीजाऊ की नीती से शिवबाने स्वराज का निर्माण किया।
दख्खन की इस भुमि पर
केसरिया लहरा दिया।।
इस स्वाभिमानी चिंगारी से औरंगजेब के तख्त हिल गये।
जीजाऊ के आशीर्वाद से
शिवबा छत्रपती बन गये।।
स्वराज का छञ देख के
राजमाता धन्य हुई ।
सन १६७४ मे उनकी
प्राण ज्योत बुझ गई।।
स्पर्धकाचे नाव-संदिप रंगनाथ डाके
वय-२४
पत्ता-सिताई निवास,बाजार रोड,वालुर ता.सेलु जि.परभणी पोस्टल कोड ४३१ ५०३
मो.नं.(whatsapp) ९९२३५३२३८२
This is copyright content of sandip rangnath dake ©
शबाना नंतर नरकातुन बाहेर काढले काजल(सीमा) ला
"शबाना नंतर नरकातुन बाहेर काढले काजल(सीमा) ला
भोकर म्हैसा रोडवर भोकरपासुन जवळच साईनाथ कला केंद्र आहे
तमाशाच्या लावणीच्या नावाखाली देहव्यापार खुलेआम चालतो
अल्पवयीन मुलीना लोभ दाखवुन जबरदस्ती ह्या व्यवसायात ढकलले जाते आणी सुरू होतात नरकयातना
पैश्याच्या जीवावर सत्तरीचा म्हातारा पण कोवळी मुलगी पाहतो ऊपभोगण्यासाठी
पोलीसात तक्रार दीली पण राजकीय बड्या धेड्याचा पाठींबा असल्याने कायदा पोहचत नव्हता तीथपर्यंत
काजल ला भेटून सवीस्तर माहीती घेतली
लहानपनीच आईच छञ हरवल बाप पण दारूचा खुपच व्यसनी
वीकण्यास काही ऊरल नाही म्हणुनच मुलीलाच दलालामार्फत पुण्यात वीकले
पुण्यात एक वर्ष राहुन तीथल्या लोकांनी नागपुरच्या गंगा जमुना एरीयात पाठवल तीथुन परभणी मघ भोकर
यातुन बाहेर पडायच का वीचारल असत होकार दीला तीने
गावातील तरूण घेऊन तीला आणण्यास गेले
तीथली आंटी म्हणाली 30हजार द्या घेऊन जा
लगेच सर्वानी वर्गनी करून पैसे दीले आणी घरी आणले
एरवी समाजात काॅलर टाईट करून फीरणारे भोकरचे बरेच प्रतीष्टीत राञीला तोंड काळ करायला जातात हे पाहुन धक्काच बसला
असो जैसी कर्णी वैसी भरणी
माझ काम पुर्ण झाल मला आणखी काही नको
एक बहीणीची कमी होती ती पुर्ण झाली"
✍सौ.निलीमा शिंदे
______________________________
"आमच्या मार्गदर्शक व मैत्रीण सौ.निलीमा नेहमीचं सामाजिक कार्यात पुढे असतात.सेक्सवर्कसना नरकयातनेतुन बाहेर काढुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे.त्यांच्या या कार्यात आम्हीही त्यांच्या पाठीशी उभे आहोत."
✍संदिप डाके ।Blogger
©२०१७
Pimpalgao Gosavi-पिंपळगाव (गोसावी) येथील प्राचीन शिल्पकलेची बारवं/विहीर!
पिंपळगाव (गोसावी) येथील प्राचीन शिल्पकलेची बारवं/विहीर! |
सेलु तालुक्यातील पिंपळगाव गोसावी येथे प्राचीन शिवलींग मंदिर आहे.या मंदीराच्या पुर्वेला एक बारवेसारखी विहीर आहे.या विहीरीचा आकार चौकोनी आहे.विहीरीच्या आतील भिंतीवर आपल्याला विवीध शिल्पपट्ट पहायला मिळतात.या मध्ये गजपट्ट,अश्वपट्ट,राजहंस,तोरणपट्ट,भौमीतीय शिल्पपट्ट,रत्नशिल्प,युद्धप्रसंग व उठावदार कामक्रीडा शिल्प आहेत.येथील कामक्रीडा शिल्प हे खजुराओ येथील शिल्पांशी साम्य दर्शवनारे आहेत.
प्राचीन मंदिर स्थापत्यात बारवं/पुष्कर्णीला महत्व होते.पाण्याची साठवण व स्ञोत म्हणुन बारवं व विहीरींची निर्मीती केली जायची.शिल्पींनी आपल्या हाताने या बारवं व विहीरींच्या आतील भागावर शिल्प चितारली आहेत.ही विहीर सध्या सुस्थीतीत आहे.खरचं मराठवाड्यात शिल्पींच्या शिल्पकलेचा शिल्पाविष्कार आहे.ही अज्ञात ठिकाणं पर्यटक व अभ्यासकांच्या दृष्टीस आणुन देणे हाचं #IncredibleMarathwada चा उद्देश आहे.
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
PimpalgaoGosavi(Pushkarni) |
वझर(खु) ता.जिंतुर जि.परभणी
मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर हे ठिकाण आहे.या ठिकाणी प्राचीन शिवलिंगमंदीर आहे.मंदीराच्या बाहेर एका झाडाच्या खाली ही जोड शिव-नंदीची शिल्प आहेत.
स्थानिकांना मी विचारल्यानंतर कळाले की,येथील महादेवाला भक्त नवस बोलतात आणि तो पुर्ण झाल्यानंतर या झाडाखाली दगडाचे शिवलींग व नंदी ठेवुन नवस फेडतात.
या परंपरेने आज इथे या झाडाखाली शिवलींग व नंदींच साम्राज्यचं तयार झालयं.#IncredibleMarathwada चा प्रवास करताना वाटेतं आढळलेलं हे ठिकाण.
#StoneSclupture #BlindFaith #Shivlinga
हेमाडपंती मंदीर,रामदरा,वाघी धानोरा,ता.जिंतुर जि.परभणी
रामदरा येथील स्थापत्य शिल्पाविष्कार!
वाघीधानोरा ता.जिंतुर जि.परभणी या गावापासुन १ कि.मी अंतरावर दक्षीणेला ओढ्याच्या काठावर रामदरा हे ठिकाण आहे.येथे हेमाडपंती शिवलींग महादेव मंदीर व दोन देवीचे मंदीर आहेत.येथील मंदीराच्या खांबावर शिल्पकलेचा अविष्कार बघावयास मिळतो.
मंदीराच्या अर्धमंडपाच्या भिंतीवर कामक्रीडा शिल्पे आहेत.तसेचं ऋषी-मुनी,व्याल,गज,मानव शिल्प आहेत.स्थानिक येथील महादेवाला ओमकारेश्वर म्हणतात.मंदीराचा जिर्णोद्धार करताना येथील शिल्पांना पेंट कलर दिला आहे.त्यामुळे जुणं रुप हे मंदीर हरवुन बसले आहे.देवीच्या मंदीरात एकुण तिन शिल्प आहेत.माञ भक्तांनी शेंदुर लावल्यामुळे शिल्प समजण्यास अडथळा येतो.स्थानिक या देवीला तुळजाभवानी म्हणतात.शिल्पांचे निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की हि तुळजाभवानी नसुन महिषासुरमर्दिनी आहे.
तसेचं येथील डोंगरावर काही शिल्प आहेत.जे बहुधा विरगळ प्रकारातील असावे.
मराठवाड्यात स्थपती आणि शिल्पी यांचा शिल्पाविष्कार आहे माञ कुठे ऑईल पेंट मारुन तर कुठे शेंदुर फासुन हा प्राचीन वारसा संपवण्याचे काम येथील लोक करत आहेत.संवर्धन करणे तर लांबचं पण शिल्पकलेचे हे दगड धुने धुन्यासाठी वापरतात हे आमच्या मराठवाड्याचं शिल्पकलेवर असलेले प्रेम आहे.
#incrediblemarathwada
✍संदीप डाके ।Blogger
©२०१७
ब्लॉग व येथील संपुर्ण फोटो खालील लिंकवर
Subscribe to:
Posts (Atom)
-
जन्माचे गावं नाही,घराचा पत्ता नाही,मतदान नाही,आधार नाही,रहीवाशी नाही,शिक्षण नाही अशी अवस्था आहे येथील भटक्या जमातींपैकी एक असलेल्या ...
-
साधारण देवदासी या शब्दाची उकल केली की असं वाटतं की,देवाची सेवा करणारी म्हणजे देवदासी! देवदासी या प्रथेचे मुळ येथील शोषण व्यवस्था,धर्म आ...
-
Pingaleshwar Mahadev Temple(Shivlinga Temple) परभणी पासुन १० कि.मी अंतरावर पिंगळी हे गाव आहे.पिंगळी स्टेशन म्हणुन सुद्धा हे गाव ओळखले ज...