शबाना नंतर नरकातुन बाहेर काढले काजल(सीमा) ला


"शबाना नंतर नरकातुन बाहेर काढले काजल(सीमा) ला
भोकर म्हैसा रोडवर भोकरपासुन जवळच साईनाथ कला केंद्र आहे
तमाशाच्या लावणीच्या नावाखाली देहव्यापार खुलेआम चालतो
अल्पवयीन मुलीना लोभ दाखवुन जबरदस्ती ह्या व्यवसायात ढकलले जाते आणी सुरू होतात नरकयातना
पैश्याच्या जीवावर सत्तरीचा म्हातारा पण कोवळी मुलगी पाहतो ऊपभोगण्यासाठी
पोलीसात तक्रार दीली पण राजकीय बड्या धेड्याचा पाठींबा असल्याने कायदा पोहचत नव्हता तीथपर्यंत
काजल ला भेटून सवीस्तर माहीती घेतली
लहानपनीच आईच छञ हरवल बाप पण दारूचा खुपच व्यसनी
वीकण्यास काही ऊरल नाही म्हणुनच मुलीलाच दलालामार्फत पुण्यात वीकले
पुण्यात एक वर्ष राहुन तीथल्या लोकांनी नागपुरच्या गंगा जमुना एरीयात पाठवल तीथुन परभणी मघ भोकर
यातुन बाहेर पडायच का वीचारल असत होकार दीला तीने
गावातील तरूण घेऊन तीला आणण्यास गेले
तीथली आंटी म्हणाली 30हजार द्या घेऊन जा
लगेच सर्वानी वर्गनी करून पैसे दीले आणी घरी आणले
एरवी समाजात काॅलर टाईट करून फीरणारे भोकरचे बरेच प्रतीष्टीत राञीला तोंड काळ करायला जातात हे पाहुन धक्काच बसला
असो जैसी कर्णी वैसी भरणी
माझ काम पुर्ण झाल मला आणखी काही नको
एक बहीणीची कमी होती ती पुर्ण झाली"
✍सौ.निलीमा शिंदे
______________________________

"आमच्या मार्गदर्शक व मैत्रीण सौ.निलीमा नेहमीचं सामाजिक कार्यात पुढे असतात.सेक्सवर्कसना नरकयातनेतुन बाहेर काढुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे.त्यांच्या या कार्यात आम्हीही त्यांच्या पाठीशी उभे आहोत."
✍संदिप डाके ।Blogger
©२०१७

1 comment:

  1. या संदर्भात जर अन्यायी व्यक्तीने असे लेख वाचले तर त्यांच्यात खरचं बदल होऊन ते स्वतःहून या नरकातून बाहेर पडून चांगलं जीवन जगतील,पण मुळात गरिबीशी झुंजत असताना शिक्षण सुद्धा घेतल नसल्याने त्यांना कठीण आहे.ते काम नीलिमा ताई यांसारख्या भगिनीच करू शकतात.

    ReplyDelete