यादवकालीन शिव मंदीरांचे गाव!भाग-१(Village of Temple Charthana-Part1)

Barav pushkarni
बारव

होय...आपल्या मराठवाड्यात प्राचीन मंदीरांच गाव आहे.(Village of Temple)जिथे ३६० मंदीरं होती.धक्का बसलाना हे ऐकुन.पण हे खरं आहे.

परभणी जिल्ह्यातील चारठाणा हे जिंतुर तालुक्यातील सगळ्यात मोठे गावं.परभणी वरुन ७५ कि.मी  व जालण्यावरुन ८२ कि.मी अंतरावर असलेले चारठाणा हे गाव आता Village Of Temple म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे.

आमच्या Incredible Marathwada या मोहीमेची सुरुवात आम्ही चारठाणा पासुन सुरु केली आहे.या मोहीमे अंतर्गत मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळे जगातील पर्यटकांच्या नकाशावर आणने हा आमचा उद्देश आहे.या मोहीमेसंदर्भात एक स्वतंत्र ब्लॉग लिहुन या मोहीमेची माहिती दिली जाईल.

Village of temple
Charthana Entrance Gate

 

कालचं आम्ही चारठाणा येथे जाऊन येथील वारसास्थळांची पाहणी केली.येथे गेल्यानंतर आमची भेट झाली ती संतोष दुकानदार यांच्याशी संतोष हे पुरातत्व खात्यात केअर टेकर म्हणुन काम करतात.त्यांनी आम्हाला बोलताना सांगितले की,"चारठाण्यात एकुण पुर्वी ३६० मंदिरे होती.त्यापैकी आता गोकुळेश्वर,खुराची देवी,जोडमहादेव,गणपती आणि महादेव,उकंडेश्वर व नृसिंह तिर्थ ही मंदिरे असुन बारव(पुष्कर्णी) व दिपस्तंभ ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.तसेचं दोन नविण शिवलींग मंदिरं उत्खणनात सापडल्याचेही सांगितले.त्यांनी आम्हाला वरील ठिकाणांची प्राथमिक माहिती देऊन या स्थळांना जाण्याचा मार्ग दाखवला.(वरील प्रेक्षणीय स्थळं गुगल मॅपवर आहेत)आणि सुरु झाला आमचा प्रवास Village Of Temple चा.



सुरुवातीला आम्ही रेणुका देवी मंदीर म्हणजे स्थानिक लोक जिला खुराची देवी म्हणतात तिथे गेलो.मंदीराच्या आत मुख्य प्रवेशद्वारातुन प्रवेश केला तेव्हा अवाक् झालो ते या मंदीराचे छत(Sealing) बघुनं.शिल्पकलेचा वापर करुन अत्यंत सुंदर,सुबक दगडाला कोरुन बनवलेली छत जी दगडाला तासुन एकमेकांत फसवलेली आहेत.यावरुन ती निश्चितचं यादवकालीन हेमाडपंती असावीत असे वाटते.हेमाडपंती स्थापत्य शास्ञात कमीत-कमी चुण्याचा वापर व जास्तीत-जास्त दगडं तासुन एकमेकांत फसवले जातात.याचं छतावरील




नक्षीकामावरुन या देवीला "खुराची देवी" म्हणतात.कारण स्थानिकांच्या नजरेतुन हे नक्षीकाम जनावरांच्या खुरेसारखे आहे.मंदीराच्या गर्भगृहात रेणुका देवीचे शिर आहे.मंदीरातील खांबावर विवीध शिल्प कोरलेले आहेत.हत्ती,सिंह,व्याल,अप्सरा,नाग व काही प्रसंग चित्र पहावयास मिळतात.एकंदरीत मंदीराची पाहणी केल्यानंतर मुळ  मंदीर रेणुका देवीचे आहे का याबद्दल शंका निर्माण होते.

हे मंदीर पाहील्यानंतर आम्ही गेलो ते जोडमहादेव मंदीरात.रेणुका देवी मंदीराच्या पाठीमागेचं हे मंदीर आहे.आहे.हे देखील मंदीर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे.याठिकाणी दोन शिवलींग आहेत.मंदीराची छत देखील आकर्षक आहे.येथील खांबावर नाग व व्याल शिल्प आहे.गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वरच्या बाजुस गणपती व खालच्या बाजुस हत्ती व व्याल शिल्प आहे.गर्भगृहातील शिवलींग पिंडीवर एका बाजुस गोमुख आहे.येथील गर्भगृह साधारण पाच फुट खोल आहे व शिवलींग आकाराने मोठे आहे.या मंदीराला दोन मुख्य द्वार आहेत.या मंदीराचे संवर्धनाचे काम झाले आहे.

हे दोन मंदीर पाहील्यानंतर आमचा उत्साह वाढला व इतर मंदीरात आता काय-काय नविण बघायला मिळणार याची उत्सुकता ही वाढली.यानंतर आम्ही गेलो गोकुळेश्वर मंदीरामध्ये.येथील प्रवेशद्वार शिल्पांनी व नक्षीकामाने भरुन आहे.प्रवेशद्वारावरील खांबावर दोन्ही बाजुंनी अप्सरा व बहुधा अष्टमातृका आहेत.तसेच खांबाच्या मध्यभागी काही प्रसंग कोरलेले आहेत.या मंदीराला हे एकचं द्वार आहे.मंदीरामधील भजनमंडपाच्या दोन्ही बाजुला दोन छोटी गर्भगृहे आहेत व एक मुख्य गर्भगृह जिथे शिवलींग आहे.गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजुस गणपती व खालच्या बाजुस व्याल आहेत.येथील व्यालशिल्प थोडे वेगळे आहे.भजनमंडपाच्या खांबावर नाग आहेत.आम्ही गर्भगृहात प्रवेश करुन येथील भिंतीची पाहणी केली त्यावर एक चिन्ह आमच्या निदर्शनास आले.हे चिन्ह आहे की एखाद्या भाषेचा शब्द हे माञ तपासुन पहावे लागेल.

गोकुळेश्वर मंदीराच्या बाजुलाचं येथील महत्वाचं आकर्षण ठरलेली बारव आहे.जिला पुष्करणी असे म्हणतात.मंदीर बघीतल्यानंतर आमची नजर गेली ती या बारवेवर.अत्यंत भव्य व डोळ्याचे पारणे फेडणारी ही बारव आहे.या बारवेला दोन मुख्य द्वार आहेत व एका द्वाराची निर्मीती अलिकडच्या काळात झाली असावी असे निरीक्षणातुन लक्षात येते.पायऱ्या उतरुन आम्ही बारवात प्रवेश केला.बारवाच्या चहुबाजुंनी मंडप आहे.एकुण २४ खांबावर हा मंडप होता.माञ उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरील ४ खांब पडल्यामुळे तेथील  मंडप सध्या अस्तित्वात नाही माञ खांब त्यांच्या जागेवर पडलेले आहेत.येथील खांबाच्या वरच्या बाजुस नाग आहेत व काही खांबांच्या मध्य भागी व्याल शिल्प आहेत.चहुबाजुंनी असलेल्या मंडपाच्या भिंतीवर २७ देवळ्या आहेत.तसेचं पुर्व-पश्चिम मंडपात बारवेच्या मधोमध दोन खोल्या आहेत.यातील पश्चिम खोलीमध्ये एक रहस्यमय वाटणारी देवळी आहे.तसेचं या परीसरात भुयार असल्याचे स्थानिक सांगतात.येथील बारवेत सध्या हिरवट पाणी आहे.पाण्याने बारव पुर्ण भरलेली आढळुन आली.आम्ही बारव पाहत असताना काही स्थानिक महिला पाणी नेत होत्या यावरुन या पाण्याचा वापर होतो हे आपल्याला समजते.बारवेच्या दक्षिण द्वारातुन आम्ही वर आलो तेव्हा समोर याच शैलीतील वास्तु दिसली.माञ तिथे कुलुप असल्यामुळे बाहेरुनचं तिचे निरीक्षण केले तेव्हा ती मंदीर नसावी असा आमचा अंदाज आहे.माञ या वास्तुच्या समोर अनेक शिल्प अस्ताव्यस्त अवस्थेत दिसुन आली.यात प्रामुख्याने शिवलींग पडलेली दिसतात व याच्या वर पुरातत्व खात्याची पाटी.हि वास्तु बघुन आम्ही परत गोकुळेश्वर मंदीराच्या प्रवेशद्वारावर आलो तेव्हा प्रवेशद्वाराच्या समोरील भागात नंदी व शिवलींग दिसले.येथेही अनेक शिवलींग,शिळा,शिल्प अस्ताव्यस्त पडलेली दिसुन आली.येथुन थोडे समोर आल्यानंतर आम्हाला ढासळलेला एक बुरुज दिसला व आमचा पुढचा प्रवास नृसिंह तिर्थ येथे जाण्याचा सुरु झाला.

(...क्रमश)

Charthana
Sclupture On Pillar at Renuka Temple


Charthana
Sclupture On Pillar at Renuka Temple


Charthana
Narsimha at Renuka Temple


Charthana
Jodmahadev Shivlinga(2)


Charthana
Sealing of Renuka Temple


Charthana
Sclupture On Pillar at Renuka Temple


Charthana
Sclupture


Charthana
Sclupture


Charthana
Sealing of Renuka Temple


Charthana
Renuka Temple(khurachi devi)


Charthana
Apsara at Renuka Temple


Charthana
Jodmahadev Temple


Charthana
Elephant sclupture


Charthana
Jodmahadev Temple Garbhgruha entrance sclupture


Charthana
Jodmahadev Shivlina (1)


Charthana
Elephant Sclupture


Charthana
vyal at Jodmahadev


Charthana
stone sclupture beside Renuka Temple


Charthana
Jodmahadev Temple Entrance Gate


Charthana
Sclupture On Pillar at Renuka Temple


Charthana
Sclupture On Pillar at Renuka Temple


Charthana
Sclupture On Pillar at Renuka Temple


charthana
Sealing Of Renuka Temple(khurachi devi)


charthana
Renuka Temple(Khurachi Devi)


charthana
Sealing of Gokuleshwara Temple


charthana
Gokuleshwara Temple


charthana
Gokuleshwar Shivlinga


charthana
Unknown Sign on Wall Of Gokuleshwar GarbhGruha


charthana
Unknown Sign on Wall Of Gokuleshwar GarbhGruha


charthana
Gokuleshwar Mandap


Charthana
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana


Charthana
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana


Charthana
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana


Charthana
Stone Sculpture at Gokuleshwar Temple,charthana


Charthana
Pillars of Entrance gate At Gokuleshwar Temple


charthana
Entrance Gate of Gokuleshwar Temple,Charthana


charthana
Barav(pushkarni)


charthana
Barav(pushkarni)


charthana
Barav(pushkarni)


charthana
Barav(pushkarni)


charthana
Barav(pushkarni)


charthana
Pushkarni Barav


charthana
Barav Devli


charthana
Barav(Pushkarni)


charthana
Pillars of Barav(pushkarni)


charthana
Vyal Stone Sculpture On Pillar at Barav(Pushkarni)




charthana
Unknown At Gokuleshwar Temple





charthana
Gomukh At Jodmahadev Temple


charthana
Gomukh At jodmahadev temple

यादवकालीन शिव मंदीरांचे गाव!भाग-१(Village of Temple Charthana-Part1)

यादवकालीन शिव मंदिरांचे गाव! भाग-२ (Village of Temple Charthana Part-2)

 



















 



बालदिन आणी लहान मुलांचे लैंगीक शोषण!

Picture Courtesy:Youthkiaawaz.com

आज सगळीकडे "बालदीन" साजरा केला जातोय.प्रत्येकजण बालदीनाच्या पोस्ट टाकतोयं.माञ भारतामध्ये लहान मुलांसोबत काय घडतयं याची तुम्हाला कल्पना आहे का? नाही.याची आम्हाला कल्पना ही नाही की,आपल्या लहान मुलांच लैंगीक शोषण होतयं.
भारतासहीत जगभरातील सर्वचं देशांना Child Sex Abuse ने ग्रासले आहे.याची आकडेवारी डोके चक्रावुन टाकणारी आहे.अमेरीकेत ५ मुलीपैकी १ आणि २० मुलांपैकी १ जण लैंगीक शोषणाचा बळी असतो. द.अफ्रीकेत तीन मिनीटांना एका लहान मुलावर बलात्कार होतो.
भारतामध्ये २००१ ते २०११ दरम्यान ४८००० मुलांवर बलात्कार झाल्याच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.
२००७ च्या एका अहवालानुसार भारतात ५३% मुलांवर लैंगीक अत्याचार होतात.हे आकडे धक्कादायक आहेत माञ हे फक्त दिसते आकडे आहेत.अंधारातील म्हणजे न नोंदवले गेलेले आकडे तर वेगळेचं.
Child Sex Abuse हा विषय प्रत्येकाने निट समजावुन घेणे आवश्यक आहे व जास्तीत-जास्त पालकांना याबद्दल माहिती असणे आताच्या आधुनिक युगात आवश्यक आहे.
कारण Child Sex Abuse हा विषय  आता फक्त  वास्तव जगाशी संबधी राहीला नाही तर तो आभासी म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातुन सुद्धा लहान मुलांचं लैंगीक शोषण केलं जातयं.

Picture Courtesy:hindustan Times
लहान मुलं कोवळ्या वयात कुसकरली जात आहेत आणि हे कृत्य करणारी माणसं लांबची नाहीत.लहान मुलांच्या लैंगीक अवयवावरुन हात फिरवणे व इतर अशे अनेक प्रकार जे इथे मी लिहु शकत नाही.
ईथे भारतात प्रौढांना लैंगीक शिक्षण वा लैंगीक विषय व्यवस्थित समजलेला  नाही तर लहान मुलं दुरची गोष्ट.
मी लहान असताना आमच्या गावी एका शेळ्या सांभाळणाऱ्या लहान मुलावर वय २५ असणाऱ्या तरुणाने बलात्कार केला.हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आले.त्यावेळेस त्याची आत्मियतेने चौकशी करुन त्याला धीर देणे तर लांबचं परंतु पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले बघे कसं झालं? काय केलं? झालं का? अशा गोष्टींवर चर्चा करत होते.
Picture Courtesy:Noukrinama.com
यातुन समाजाची माणसिकता आपल्या लक्षात येते.त्यामुळे लैंगीक शोषणाची शिकार झालेली मुलं याबद्दल कुणाकडेही वाच्यता करत नाहीत.
त्यामुळे पालक व सामाजिक कार्यकरत़्यांनी हा विषय निट समजुन घेउन मुलांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
पिंकी विराणी या लेखीकेने भारतातील लहान मुलांचं लैंगीक शोषण या विषयावर "बिटर चॉकोलेट" हे पुस्तक लिहीले आहे.वयाच्या सोळाव्या वर्षाआधी भारतातील एकुण मुलामुलींपैकी २०% लहान मुलं लैंगीक शोषणाला बळी पडतात.त्यातली निम्मी मुलं घरातील व्यक्तीकडुनचं या प्रकारचे बळी पडतात.हे भयानं वास्तव पिंकी यांनी बाहेर आणलं.
लहान मुलांचं लैंगीक शोषण थांबवण्यासाठी अनेक NGO काम करत आहेत.त्यापैकी "आरंभ" ही या विषयांवर काम करत आहे.आपणही या बालदिनी Child Sex Abuse थांबवण्यासाठी संकल्प करुया.जमेल त्या माध्यमातुन,जास्तीत-जास्त पालकांना या विषयाची माहिती देऊन,आपल्या समोर एखाद्या मुलाचं लैंगीक शोषण होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उचलुन,प्रत्यक्ष पोलीसात तक्रार देऊन.
#StopChildSexAbuse
.....................................
✍संदीप डाके । Blogger
©२०१७


(Social Awareness Film - Khushi (Happiness) | Child Safety Film
https://youtu.be/uYnbXj0_aHo 

Satyamev Jayate - Child Sexual Abuse - 13th May 2012
https://youtu.be/hY8CyTeegrM

हा जन्म पुन्हा नको...!

एखाद्या सिग्नल वा पेट्रोल पंपावर थांबल्यावर एखादा हिजडा येताना दिसला की, आपण पळ काढण्याचा प्रयत्न करतो.माञ तो आपल्याकडे येतो ते फक्त भिक मागण्यासाठी.हिजड्यांना समाजाने मुख्य प्रवाहात कधीचं राहु दिलं नाही.त्यामुळे भिक मागुण आपल्या पोटाची खळगी भरण्याशीवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो.
हिजड्यांना बघुन काहींना आनंद होतो तर काहींना राग येतो.माञ याचं समाजातील काही लोक या हिजड्यांचं लैंगीक शोषण करतात...त्यांना अश्लिल भाषा आणी वाईट नजरांनी त्यांच जगणं मुश्कील करुन टाकतात.
त्यांना ना कोणी कामावर ठेवतं ना त्यांना कोणी आपलं समजतं.पावला-पावलावर समाज त्यांची चेष्टा करायला तयार असतो.ट्रेन मध्ये हे हिजडे भिक मागण्यासाठी फिरत असतात.
ऐ चिकने...ऐ हिरो...म्हणतं तरुण,कॉलेजकुमार यांच्या गालावरुन हात फिरवतं पैसे जमा करतात.त्यांनी ठरवलं तर पैसे घेतल्याशिवाय एखाद्याला सोडतसुध्दा नाहीत व गरज पडल्यास ...वर करण्याची धमकी सुद्धा देतात.हा प्रसंग रेल्वेप्रवाश्यांना एकदा तरी आलेला असतो.
हा सगळा प्रकार पाहुन कुणीही त्यांचा द्वेषचं करणार हे तर साहजिकचं आहे.परंतु हिजड्यांना हे करावंचं लागतं कारण परीस्थीतीने त्यांना हे सगळं करण्यासाठी मजबुर केलेलं असतं.स्वतः च घर सोडलेलं असतं,कुटुंबाने,समाजाने वाळीत टाकलेलं असतं आणी मग जगण्यासाठी,पॊटाची आग विझवण्यासाठी भिक मागावी लागते.भीक मागण्याची पध्दत "दिली तर प्रेमाने नाहीतर धमकीने".
रेल्वेतही आम्हाला हिजड्यांच्या हातातील दहा रुपयांच्या नोटा दिसतात.माञ या नोटा गोळा करताना  हवसचे गिधाडं जो ञास त्यांना देतात ते आम्ही मस्त उघड्या डोळ्यांनी बघत असतो.गर्दीचा फायदा घेतं कुणी त्यांच्या अंगावर-अंग घासतो तर कुणी त्यांच्या हिप्सला हात लावतो तर कुणी "चलतीक्या म्हणुन त्यांच्या देहाचे लचके तोडण्यासाठी तयार असतो.
"मी हिजडा व्हावं वा आपला मुलगा ट्रान्सजेंडर जन्माला यावा अशी कुणाची मनो-मन इच्छा असते का?" नाही,अशी कुणाचीचं इच्छा नसते परंतु मुलगा वयात आल्यानंतर त्याला मुलांबद्दल लैंगीक आकर्षण वाटायला लागतं व त्यावेळेस त्याला आपल्यातला स्ञीभाव लक्षात येतो.गर्भात झालेल्या गोंधळामुळे ट्रान्सजेंडर म्हणुन त्यांचा जन्म होतो.यासाठी त्यांचे आई-वडीलही दोषी नाहीत आणी स्वतः ही ते नाहीत.देवा-दिकांच्या काळापासुन त्यांच अस्तित्व आहे.महाभारतात त्यांचे उल्लेख "किन्नर" म्हणुन सापडतात.
भारतीय संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिले परंतु आजही समाजात विषमतेची बीजं वाढताना दिसत आहेत.हिजड्यांना आजही समाजाचा घटक म्हणुन बघीतल्या जात नाही.
अलिकडे माळशिरस तालुक्यात एका ट्रान्सजेंडरला सरपंच म्हणुन निवडुन आणले अशा घटना अपवादानेचं दिसतातं.भारतात ३०००००० लाख ट्रान्सजेंडर आहेत.त्यांनी लढा देऊन २०१४ साली भारतातील कायदाव्यवस्थेला ट्रान्सजेंडरला तिसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणुन मान्यता देण्यास भाग पाडलं.माञ समाजाकडुन त्यांच्या पदरी निराशाचं पडली.
सध्या समाजात हिजड्यांना दिलेलं स्थान पाहता  "हा जन्म पुन्हा नको" असचं प्रत्येक हिजड्याला वाटत असतं.

✍संदीप डाके । Blogger
©२०१७


जौहर प्रथा...आणी राणी पद्मावती!


ईतिहासात अनेक प्रथा आपण पाहील्या आहेत.काही चांगल्या तर काही वाईट.सती प्रथा सर्वांना ज्ञात आहे.जिवंत स्ञीला तिच्या पतीच्या चितेवर स्व:इच्छेने किंवा बळजबरीने सती जावे लागत असे.सती प्रथा भारतात अस्तित्वात होती.
अशीचं एक प्रथा किंवा व्रत राजस्थानमधील राजपुतान्यात होते.ज्याला जौहर किंवा जौहर व्रत असे म्हणत.

जौहर म्हणजे...
आपल्या राज्यावर परकीय आक्रमण झाल्यानंतर
त्यात आपल्या सैन्याचा पराभव अटळ दिसला की,राजपुत स्ञिया शञुच्या हाती सापडुन आपल्या अाब्रुचे नुकसान होऊ नये,म्हणुन सामुहीक चिता रचुन अग्निमध्ये देहत्याग करीत व राजपुत योध्दे भगवे वस्त्र परिधान करुन शञुवर तुटुन पडत व रणांगणावर लढता-लढता वीरमरण पतकरीत असतं.

राणी पद्मावतीने केलेला जौहर इतिहासात प्रसिद्ध आहे.अल्लाऊद्दीन खिलजीने चित्तोड वर आक्रमण केल्यानंतर राणी पद्मावतीने चित्तोडगडावरील इतर स्ञियांसोबत जौहर केला.

इतिहासात जौहर वारं-वार झाल्याचे पुरावे मिळतात.जौहर करण्यासाठी कुंडांचा वापर केल्या जायचा.कुंडामध्ये ज्वलनशील लाकुड टाकुन अग्नी दिल्या जायचा.जौहर करणाऱ्या राजपुत स्ञिया देव-देवतांची पुजा करुन कुंडामध्ये उडी घेऊन देहत्याग करायच्या.

जौहर ही प्रथा आज असतीत्वात नाही परंतु ती चर्चेत आली आहे  संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपट 'पद्मावती ' मुळे!
आता भन्साळींच्या चित्रपटात जौहर पुन्हा एकदा पहावयास मिळेल माञ चित्रपट प्रदर्शनापूर्वी झालेले वाद पाहता भन्साळींचा 'जौहर' होऊ नये म्हणजे बस झाले!

ब्रेस्ट कॅन्सर वाढतोय:#PayAttention Breast Cancer Awareness


ब्रेस्ट कॅन्सर ज्या गतीने भारतात वाढतोय ते पाहता महीला व पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर विषयी साक्षर करणं गरजेचं झालं आहे.
ब्रेस्ट म्हणजे स्तन आणी स्तनाला होणारा कॅन्सर म्हणजे 'ब्रेस्ट कॅन्सर'.संपुर्ण देशांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची समस्या आहे माञ योग्य वेळी तो कळाला तर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान देखील शक्य आहे.



(ब्रेस्ट कॅन्सर संपुर्ण माहिती Video By Indian Cancer Society)

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे:
 ⚠ब्रेस्ट कॅन्सर हा ४० ते ४५ ह्या वयोगटातील महीलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
⚠अनुवंशीकतेने
⚠ब्रेस्ट मध्ये झालेल्या गाठींमुळे
⚠व्यसन:दारु पिणे,तंम्बाखु इ.
⚠हॉर्मोन्स गोळ्यांच अतीसेवन
⚠रेडीएशन:CT स्कॅन व X-Ray करताना रेडीएशन च्या जास्त संपर्कात आल्यामुळे देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो.
⚠अबॉरशन:गर्भपात
⚠कमी साईझचे ब्रा घालणे.

 ब्रेस्ट कॅन्सरची काही प्रमुख लक्षणे:
☞ब्रेस्ट/स्तनांमध्ये गाठ होणे.
☞स्तनांमध्ये व काखेत वेदना होणे.
☞स्तनांचा रंग बदलतो,जास्त लाल होणे.
☞निप्पल च्या आजुबाजुला लाल चट्टे पडणे.
☞काखेमध्ये सुज येणे.
☞निप्पलमधुन रक्त येणे.
☞स्तन जास्त नरम होणे.
☞स्तन जास्त कडक होणे.
☞एक स्तन लहान व एक मोठे असणे.
breast cancer marathi
 ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे


ब्रेस्ट कॅन्सर चे निदान व तपासणी:
☞ब्रेस्ट कॅन्सरची वर दिलेली लक्षणे  महीलांनी प्रत्येक महिण्याला  आरशा समोर उभे राहुन तपासावीत व काही लक्षणे दिसुन आल्यास डॉक्टरांना त्वरीत दाखवावे.
☞ब्रेस्ट कॅन्सरसाठी मैमोग्राफी टेस्ट आहे.मैमोग्राफीमध्ये ब्रेस्टचा एक्सरे काढल्या जातो.ज्यामध्ये तांदळाच्या दाण्या एवढ्या गाठी सुद्धा दिसतात.ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर चे निदान करताना ब्रेस्ट काढावे लागत नाहीत.
माञ ब्रेस्ट कॅन्सर एडवान्सडं स्टेज मध्ये असेल तर ब्रेस्ट ऑपरेशन द्वारे काढावे लागते.
(मैमोग्राफी बद्दल माहिती देणारा व्हिडीओ)

 ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांनाच होतो का ? तर नाही तो पुरुषांना सुद्धा होऊ शकतो माञ त्याचे प्रमाण कमी आहे.आतापर्यंत भारतामध्ये ७०००० हजार महीलांना ह्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे आपला जिव गमवावा लागला आहे व २०२० पर्यंत  आणखी ७०००० महीलांना आपला जिव गमवावा लागेल अशी शक्यता एका अभ्यासातुन पुढे आली आहे.ब्रेस्ट कॅन्सर भारतात शहरी भागात आढळतो माञ आता ग्रामीण भागातही तो वाढत आहे.त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची माहिती सर्वांपर्यंत पोहचनं गरजेचं आहे.कारण योग्य वेळी त्याच्यावर उपचार शक्य आहेत.
ही जबाबदारी सर्वांची आहे कारण आपण भारतात राहतोत जिथे अंधश्रद्धा लोकांमध्ये फुटुन भरलेली आहे.स्तनात गाठ झाली तर आमच्याकडे महीला कोणीतरी करणी केली असं म्हणतील म्हणुन ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आपल्या परीवारातील प्रत्येकांना द्या...!
✍संदीप डाके। Blogger 
©२०१७

संदर्भ:
१.http://www.onlymyhealth.com
2.Medifee.com
3.Indian Cancer Society

डोंबारी...आयुष्यभर भटकणारा समाज!

sandip dake blog
जन्माचे गावं नाही,घराचा पत्ता नाही,मतदान नाही,आधार नाही,रहीवाशी नाही,शिक्षण नाही अशी अवस्था आहे येथील भटक्या जमातींपैकी एक असलेल्या 'डोंबारी' समाजाची.
१९६५ ला उषा चव्हाण यांनी गायलेल्या आेळी

उद्याच्या पोटाची काळजी कशाला,
आभाळ पांघरु दगड उशाला,
गाळुनी घाम आता मागु या भाकरी।

नाचतो डोंबारी गं 
नाचतो डोंबारी।।

वरील ओळी या डोंबारी समाजाचं वास्तव चित्र सांगणाऱ्या आहेत.
डोंबारी ही जमात आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगना,राजस्थान,तामीळनाडु,ओरीसा,हिमाचल प्रदेश,बांग्लादेश व महाराष्ट्रात आढळते.
डोंबारी समाजाचा ईतीहास फारसा मिळत नाही.महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईत डोंबारी त्यांच्या सोबत असल्याचे काही लेखी पुरावे मिळतात तर छञपती शिवरायांच्या ईतीहासातई डोंबारी समाजाचे उल्लेख सापडतात.महाराष्ट्रात डोंबारी राजस्थानमधुन भटकत आल्याचे बोलले जाते.डोंबारी हा सध्या तरी खेळ करुन भिक मागुन जगणारा समाज आहे.डोंबारी समाजात मुलीचे लग्न हे बालवयातचं केले जाते आणि हो लग्न करण्यासाठी तिला डोंबाऱ्याचे सगळे खेळ येणे बंधनकारक असतात.जर तिला हे खेळ येत नसतील तर अशा मुलींचे लग्न सुद्धा होत नाहीत.डोंबाऱ्याच्या घरी मुल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण म्हणजे काय हो,६' इंचाच्या गोल रिंगमधुन संपुर्ण शरीर आत टाकणे व बाहेर काढणे हा खेळ प्रकार करताना त्या चिमुकल्या जिवाला असह्य वेदना होतात त्या जाणवु नये म्हणुन गावठी दारु पाजली जाते व लहान पाखरं अल्पवयातचं व्यसनाच्या आहारी जातात.
आॅल्म्पीक मधील खेळाडुंना ही लाजवेल अशा कसरती डोंबारी समाजातील मुली करतात.
डोंबारी समाजात एक प्रथा आहे ती म्हणजे अंघोळ न करण्याची.विशेष करुन महिलांना वर्ष-सहा महीने अंघोळ करु दिली जात नाही ज्यामुळे महिलांच्या अंगाचा वास येतो ज्यामुळे परपुरुष तिच्याकडे आकर्षीत होत नाही.
डोंबाऱ्याचं बिऱ्हाड आज या गावाला तर उद्या दुसऱ्या म्हणुन या अंघोळ न करण्याच्या प्रथेचा गावगुंडांपासुन आपली अब्रु वाचवण्यासाठी उपयोग होतो.
डोंबारी महिलांना स्वयंपाक येत नाही.ज्या गावात खेळ तिथेचं काही घरी भिक मागुण आपल्या कुटुंबाच्या पोटाची कशी-बशी आग विझवली जाते.
पुर्वी म्हणजे आमच्या लहानपणी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धा गावं जमा होऊन हा खेळ पहायचां.त्याच्यामध्ये रिंगमधुन शरीर बाहेर काढणे,तारेवर बांबु घेऊन चालने,कोल्हाट उड्या मारणे,डोळ्यात सुई पकडणे अशे नानाप्रकारचे साहसी व धाडसी खेळ दाखवले जायचे.खेळ झाल्यावर जमलेले बघे आठ आणे,रुपया व जास्तीत-जास्त दहा रुपयं द्यायचे.माञ आता परीस्थीती बदललीयं! कालचं आमच्या गावी खुप दिवसानंतर  डोंबारी कुटुंब खेळ करण्यासाठी आले माञ त्यांना बघणारे डोळेही कमी झाले आणि देणारे हातही.
बदलत्या काळात हा समाज खुप पाठीमागे राहिला.या समाजाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा फायदा झाला नाही.हा समाज सुधरला पाहिजे यासाठी लातुरमधील आमचे मिञ नरसिंग झरे यांनी प्रयत्न सुरू केले.त्यांनी सर्वप्रथम या डोंबाऱ्याना लातुरमधील अनसर वाड्यावर स्थाईक केले.येथे त्यांना स्वयंपाक करायचे शिकवुन डोंबारी महीलांना रोजगार मिळवुन दिला.डोंबारी पुरुषांना बॅंड पथकाचे प्रशिक्षण देऊन व्यसनांपासुन परावृत्त केले.
डोंबारी समाजातील  मुले आता नरसिंग झरेंच्या सांगण्यावरुन शाळेत जातात.निश्चितच ही चांगली बाब आहे.माञ आजही हा समाज न्यायापासुन वंचीत आहे.शासन या बाबतीत उदास आहे.त्यामुळे  समाज म्हणुन आपणचं येथुन पुढं त्यांच्या मदतीसाठी पुढे यायला पाहिजे. डोंबाऱ्याचा खेळ दिसला तरं बघा आणी त्यांना मदत करा! डिजीटल इंडीया च्या नादात आमचा गावरान इंडीया लोक विसरत चालले आहेत.
अशा ५२ जाती एकट्या महाराष्ट्रात आहेत ज्यांना अन्न,वस्ञ व निवारा नाही,स्वतःची ओळख नाही. गायी-म्हशी सारखं बाळंतपण होतं ओ, या माता-भगीनींचं! मगं आम्ही विकसीत झालो हे ढोल बडवणं तरी बस्स करा.
बुलेट ट्रेन आणा हो ती श्रीमंतांच्या चैनीसाठी आवश्यक आहे परंतु खेड्यात राहणाऱ्या वंचीत जातींना  मुलभुत सुविधा तरी द्या!ते ही या देशाचे नागरीक आहेत.(हा माञ एक नक्की आहे त्यांच्याकडे या देशाचे रहीवाशी असल्याचा एकही पुरावा नाही माञ गायींना आधार कार्ड आहे)

✍संदीप डाके।Blogger
©२०१७

sandip dake blog
Dombari girl

sandip dake blogsandip dake blog