बालदिन आणी लहान मुलांचे लैंगीक शोषण!

Picture Courtesy:Youthkiaawaz.com

आज सगळीकडे "बालदीन" साजरा केला जातोय.प्रत्येकजण बालदीनाच्या पोस्ट टाकतोयं.माञ भारतामध्ये लहान मुलांसोबत काय घडतयं याची तुम्हाला कल्पना आहे का? नाही.याची आम्हाला कल्पना ही नाही की,आपल्या लहान मुलांच लैंगीक शोषण होतयं.
भारतासहीत जगभरातील सर्वचं देशांना Child Sex Abuse ने ग्रासले आहे.याची आकडेवारी डोके चक्रावुन टाकणारी आहे.अमेरीकेत ५ मुलीपैकी १ आणि २० मुलांपैकी १ जण लैंगीक शोषणाचा बळी असतो. द.अफ्रीकेत तीन मिनीटांना एका लहान मुलावर बलात्कार होतो.
भारतामध्ये २००१ ते २०११ दरम्यान ४८००० मुलांवर बलात्कार झाल्याच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.
२००७ च्या एका अहवालानुसार भारतात ५३% मुलांवर लैंगीक अत्याचार होतात.हे आकडे धक्कादायक आहेत माञ हे फक्त दिसते आकडे आहेत.अंधारातील म्हणजे न नोंदवले गेलेले आकडे तर वेगळेचं.
Child Sex Abuse हा विषय प्रत्येकाने निट समजावुन घेणे आवश्यक आहे व जास्तीत-जास्त पालकांना याबद्दल माहिती असणे आताच्या आधुनिक युगात आवश्यक आहे.
कारण Child Sex Abuse हा विषय  आता फक्त  वास्तव जगाशी संबधी राहीला नाही तर तो आभासी म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातुन सुद्धा लहान मुलांचं लैंगीक शोषण केलं जातयं.

Picture Courtesy:hindustan Times
लहान मुलं कोवळ्या वयात कुसकरली जात आहेत आणि हे कृत्य करणारी माणसं लांबची नाहीत.लहान मुलांच्या लैंगीक अवयवावरुन हात फिरवणे व इतर अशे अनेक प्रकार जे इथे मी लिहु शकत नाही.
ईथे भारतात प्रौढांना लैंगीक शिक्षण वा लैंगीक विषय व्यवस्थित समजलेला  नाही तर लहान मुलं दुरची गोष्ट.
मी लहान असताना आमच्या गावी एका शेळ्या सांभाळणाऱ्या लहान मुलावर वय २५ असणाऱ्या तरुणाने बलात्कार केला.हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आले.त्यावेळेस त्याची आत्मियतेने चौकशी करुन त्याला धीर देणे तर लांबचं परंतु पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले बघे कसं झालं? काय केलं? झालं का? अशा गोष्टींवर चर्चा करत होते.
Picture Courtesy:Noukrinama.com
यातुन समाजाची माणसिकता आपल्या लक्षात येते.त्यामुळे लैंगीक शोषणाची शिकार झालेली मुलं याबद्दल कुणाकडेही वाच्यता करत नाहीत.
त्यामुळे पालक व सामाजिक कार्यकरत़्यांनी हा विषय निट समजुन घेउन मुलांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
पिंकी विराणी या लेखीकेने भारतातील लहान मुलांचं लैंगीक शोषण या विषयावर "बिटर चॉकोलेट" हे पुस्तक लिहीले आहे.वयाच्या सोळाव्या वर्षाआधी भारतातील एकुण मुलामुलींपैकी २०% लहान मुलं लैंगीक शोषणाला बळी पडतात.त्यातली निम्मी मुलं घरातील व्यक्तीकडुनचं या प्रकारचे बळी पडतात.हे भयानं वास्तव पिंकी यांनी बाहेर आणलं.
लहान मुलांचं लैंगीक शोषण थांबवण्यासाठी अनेक NGO काम करत आहेत.त्यापैकी "आरंभ" ही या विषयांवर काम करत आहे.आपणही या बालदिनी Child Sex Abuse थांबवण्यासाठी संकल्प करुया.जमेल त्या माध्यमातुन,जास्तीत-जास्त पालकांना या विषयाची माहिती देऊन,आपल्या समोर एखाद्या मुलाचं लैंगीक शोषण होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उचलुन,प्रत्यक्ष पोलीसात तक्रार देऊन.
#StopChildSexAbuse
.....................................
✍संदीप डाके । Blogger
©२०१७


(Social Awareness Film - Khushi (Happiness) | Child Safety Film
https://youtu.be/uYnbXj0_aHo 

Satyamev Jayate - Child Sexual Abuse - 13th May 2012
https://youtu.be/hY8CyTeegrM

No comments:

Post a Comment