यादवकालीन शिव मंदिरांचे गाव! भाग-२ (Village of Temple Charthana Part-2)

vijaystambha charthana
Village Of Temple's Charthana

चारठाणा गावाच्या पश्चिम दिशेला हे नृसिंह तिर्थ आहे.गोकुळेश्वर बघीतल्यानंतर आम्ही थेट गेलो ते नृसिंह तिर्थला.येथेही एक मुख्य प्रवेशद्वार असुन दक्षिण-उत्तर दोन द्वार आहेत.मंदीराला गाभारा असुन गर्भगृहात शिवलींग आहे.गाभाऱ्याच्या खांबावर नाग आहेत व गावकऱ्यांनी या मंदीराच्या गाभाऱ्यात दक्षिण दिशेला शनिदेव बसवले आहेत.मंदीराच्या बाहेर पुर्वेकडे विष्णु शिल्प आहे.मंदीराच्या बाहेरुन ओट्याच्या कोपऱ्यावर शिल्प आहेत जे वानसारखे दिसतात.आम्ही मंदीर पाहुन निघालो तेव्हा इथे नविण मंदीर शोधल्याचे कळाले.एका शेतकऱ्याच्या शेतात हे मंदीर आहे.येथील शिवलींग शाबुत आहे माञ येथील मंदीर पुर्ण पडलेले आहे.या मंदीराचे अवशेष इथे भग्नावस्थेत आपल्यास पहायवयास मिळतात.
एवढी शिवमंदीर पाहुन मी तर थक्कचं झालो आणि आणखीन आमचा Village of Temple चा प्रवास बाकीचं होता.शिल्पकलेचा हा अविष्कार खरचं विद्यार्थी,अभ्यासक,पर्यटक व भक्तांसाठी हे ठिकाण पर्वणीचं आहे.
येथुन आम्ही गेलो ते थेट उकंडेश्वर शिवलींग मंदीरात.
या मंदीराचे प्रवेशद्वार सध्या अस्तित्वात नाही माञ या मंदीराचा गाभारा मंडप व गर्भगृह आहे.येथील गर्भगृहात शिवलींग आहे.माञ या ठिकाणी अत्यंत महत्वाचे "सप्तमातृका" शिल्प दक्षिणेकडील गाभाऱ्याच्या भिंतीवर आहे.या सप्तमातृका त्यांच्या वाहनासहीत कोरल्या आहेत.त्यांच्यासोबत महादेव व गणपती ही त्यांच्या वाहनासहीत दाखवले आहेत.आहेत.उत्तरेकडील गाभारा भिंतीवर मोराचे शिल्प आहे.सध्या या मंदीराचा गाभारा मंडप दोन नविण खांबावर टेकवला आहे.
उकंडेश्वर मंदिर पाहील्यानंतर आता वेळ आली होती ती उत्सुकता लागुन असलेल्या "दिपमाळ" बघण्याची.कारण ईतिहास प्रेमी मिञांकडुन या बद्दल बरचं ऐकलं होतं.उकंडेश्वर मंदीरापासुन निघालो ते दिपमाळ बघण्यासाठी.
स्थानिक लोक याला दिपमाळ,झुलता मनोरा,जैण स्तंभ,विजयस्तंभ अशा विवीध नावाने संबोधतात.दिपमाळ पाहुन आमच्या मधला संशोधक जागा झाला.साधारण ५० ते ६० फुट उंच ही दिपमाळ आहे.यावर चहुबाजुंनी मातृका शिल्प आहेत व व्याल शिल्प.इथे भग्नावस्थेत अनेक शिल्प पडलेली दिसतात.संपुर्ण निरीक्षण केल्यानंतर मनात काही प्रश्न निर्माण झाले ते म्हणजे दिपमाळ म्हणावी तर एकही जागा या स्तंभावर दिवा लावण्यासाठी नाही.झुलता मनोरा म्हणावं तर हा झुलताना दिसत नाही.जैण स्तंभ म्हणावं तर एकही जैण शिल्प यावर दिसत नाही.
त्यामुळे वरील नावाने संबोधने चुकीचे ठरेल.एक तर तो विजयस्तंभ असावा किंवा स्मृतीस्तंभ.पुर्वी युध्दात विजय मिळवल्यानंतर त्या युध्दाची आठवण म्हणुन विजयस्तंभ बांधले जायचे कींवा स्मृती प्रित्यर्थ स्मृतीस्तंभ.
त्यामुळे यावर योग्य संशोधन होणे गरजेचे आहे.आता आम्ही शेवटचं म्हणजे शिव-गणेश मंदीर कडे गेलो.गुगल मॅपवर टाकुन आम्ही मंदीराकडे जात होतो.गुगल मॅपवर शिव-गणेश मंदीर आलेही माञ आजु-बाजुला बघीतले तर कुठेचं मंदीर दिसत नव्हते,दिसत होते ते फक्त गावातील वाडे.मग आम्ही स्थानिक मुलाला विचारले असता त्याने मंदीराचा दरवाजा दाखवला आम्ही ऐन मंदीराच्या समोरचं उभे होतो या मंदीराला बाहेरुन वाड्यासारखी भिंत व दरवाजा आहे.दरवाजा खोलुन आम्ही आत मध्ये प्रवेश करताचं प्राचीन शैलीतील हे मंदीर दिसले.या मंदीराला एक मुख्य प्रवेशद्वार व पुर्व-पश्चिम द्वार आहेत.माञ पश्चिकेडील द्वार आता सिमेंट विटांनी बंद केले आहे.मंदीराच्या आत गाभाऱ्यात शिवलींग व दक्षिण भिंतीला खेटुन गणपती आहे.या मंदीरात गर्भगृह नाही.माञ मंदीराचे बाहेरुन निरीक्षण केल्यास गणपती मुळ मंदीराच्या बांधणीत नसावा,तो नंतर बसवण्यात आला असे वाटते.मंदीरातील खांबावर गणपती,नरसिंह,व्याल,आहेत.मंदीराच्या प्रवेशद्वारावर देखील शिल्प आहेत.
मंदीराच्या आतील गाभाऱ्यातील छत देखील सुबक आहे.हे मंदीर बघुन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा गावातील बारीक गोष्टींवर निरीक्षण करत होतो.आम्हाला पुरातन काही महाद्वारे दिसली तसेचं बुरुज व ठिक-ठिकाणी दिसणाऱ्या शिळा.स्थानिकांनी नाल्यांवर टाकलेल्या कोरीव शिळाही.
एकंदरीत निरीक्षण केल्यास ३६० मंदीर होती का? तर निश्चित या आकड्याबद्दल काही सांगता येणार नाही माञ मोठ्या प्रमाणात ईथे मंदीर होती हे भग्नावस्थेतील अवशेषांवरुन सांगता येते.
चारठाण्यातील ही मंदीरं बघुन समाधान लाभले व भारतातील विवीध राजवटीतील मंदीर स्थापत्य शास्ञ या विषयात आवड व जिज्ञासा निर्माण झाली.मराठवाड्यात अशी बरीचं प्राचीन मंदिर आहेत जी आपल्याला माहित नाहीत.नाहीत.त्यामुळेच येत्या काळात Incredible Marathwada द्वारे या ठिकाणांचा शोध घेऊन ही ऐतिहासिक वारसास्थळे जगाच्या पर्यटकांच्या नकाशावर आणायची आहेत यात आम्हाला तुमची मदत लागेल.
शेवटी आम्ही गावाबाहेरील साई सिद्धी उडपी सेंटर येथे चहा घेउन आमचा Village of Temple चा प्रवास संपवुन घरी परतलो.
या प्रवासात माझ्या सोबत नेहमी ऐतिहासिक विषयात रस असणारे,आमचे मिञ अशोक कोरडे सर होते.ज्यांनी येथील मंदीरांचे निरीक्षण करण्यात माझी मदत केली.
_____________________
✍संदीप डाके । Blogger
©२०१७

ब्लॉग वाचा या लिंकवर
Charthana
Nrusinh Tirth Shivlinga,Charthana

Charthana
Entrance Of Nrisinh Tirth

Charthana
Pillar's of Nrusinh Tirth Temple

Charthana
Gabhara Of Nrusinh Tirth Temple

Charthana
Vishnu Sclupture At Nrusinh Tirth Temple

Charthana
Nrusinh Tirth Temple,Charthana

Charthana
Corner Sclupture At Nrusinh Tirth Temple,Charthana

Charthana
Entrance Gate Of  Nrusinh Tirth Temple,Charthana

Charthana
New Founded Shivlinga Temple Beside Nrusinh Tirth Temple,Charthana

Charthana
New Founded Shivlinga Temple Beside Nrusinh Tirth Temple,Charthana

Charthana
Main Entrance Of west side,charthana

Charthana
Ukandeshwar Shivlinga

Charthana
Sealing Of Ukandeshwara Temple

Charthana
SaptMatrika On Wall At Ukandeshwara Temple

Charthana
Ukandeshwara Temple

Charthana
Ukandeshwara Temple

Saptmatrika,saptmatruka,Charthana
Vaishnavi Matrika on Dipmal

Saptmatrika,saptmatruka,Charthana
Bramhani Matrika On Dipmal

Saptmatrika,saptmatruka,Charthana
Matrika On Dipamal

Saptmatrika,saptmatruka,Charthana
Matrika On Dipmal

Dipmal,vijaystambha,Minar Charthana
Dipmal,Vijaystambha

Charthana
Shivalinga of Shiva&ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sclupture on centre of pillar At Shiva&Ganesha Temple

Charthana
Sealing Of Shiva&Ganesha Temple

Charthana
Entrance Of Shiva&Ganesha Temple

Charthana
Shivlinga of Shiva&Ganesha Temple

Charthana
Sealing Of Shiva&Ganesha Temple

Charthana
Entrance of Shiva&Ganesha Temple

Charthana
Pillars Of Shiva&Ganesha Temple

यादवकालीन शिव मंदीरांचे गाव!भाग-१(Village of Temple Charthana-Part1)

यादवकालीन शिव मंदिरांचे गाव! भाग-२ (Village of Temple Charthana Part-2)

 


No comments:

Post a Comment