लावणीसम्राट किरण कोरॆ...!
आपल्या सॆलु मध्ये शिवजयंती निमीत्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येत आहे.यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.दि १९ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ६ वाजता किरण कोरॆ यांचा लावण्यविष्कार होणार आहे.
काल एका मित्राने मला प्रश्न केला की,शिवजयंती मध्ये हा लावण्यांचा कार्यक्रम योग्य आहे का?
त्या मित्राला पहिले मी विचारले,तुला किरण कोरॆ माहीत आहे का कोण आहे? यावर त्याचे उत्तर होते, "नाही".
मग मी त्याला समजून सांगितले आणि त्याचे समाधान झाले.
किरण कोरॆ हे नाव मुलीचे नसुन मुलाचे आहे.किरण हा आपल्या जवळचा जिल्हा नांदेड येथील आहे.
लहानपणापासून लावणीची आवड असणाऱ्या किरणनॆ लावणी मध्ये करियर करण्याचे ठरवलॆ.अखंड मॆहणत घेऊन किरणनॆ या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.
किरणच्या या ध्यॆयात त्याला अनेक अडचणींचा सामणा करावा लागला.अनेकांनी त्याला नावं-बोटं ठेवली तर कोणी खिल्ली उडवली.मात्र आज किरणचॆ यश बघून हिचं मंडळी त्याचे कौतुक करत आहे.
संपुर्ण महाराष्ट्र आज किरणला ओळखतोय.आतापर्यंत डझनभर पुरस्कारांनी किरणचा गौरव करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रीलंका येथे त्याला गोल्ड मॆडल सुद्धा मिळाले आहे.
पुरूष असुन सुद्धा किरणनॆ लावणीसारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे व सातत्याने तो मॆहणत घेतोय.लावणी सोबतचं तो एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे.वरील फोटो बघून तुम्हाला त्याचे या क्षेत्रातील कौशल्य लक्षात आलॆचं असेल.
सॆलुचा मराठवाड्यातील पुणे असा नेहमी उल्लेख होतो.किरण कोरॆ यांच्या कलेला नक्कीचं दाद मिळॆल.किरण कोरॆंचा हा लावण्यविष्कार नक्की बघाचं.
_____________________
✍🏻संदिप डाकॆ |Blogger
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
जन्माचे गावं नाही,घराचा पत्ता नाही,मतदान नाही,आधार नाही,रहीवाशी नाही,शिक्षण नाही अशी अवस्था आहे येथील भटक्या जमातींपैकी एक असलेल्या ...
-
साधारण देवदासी या शब्दाची उकल केली की असं वाटतं की,देवाची सेवा करणारी म्हणजे देवदासी! देवदासी या प्रथेचे मुळ येथील शोषण व्यवस्था,धर्म आ...
-
Pingaleshwar Mahadev Temple(Shivlinga Temple) परभणी पासुन १० कि.मी अंतरावर पिंगळी हे गाव आहे.पिंगळी स्टेशन म्हणुन सुद्धा हे गाव ओळखले ज...
No comments:
Post a Comment