रामदरा येथील स्थापत्य शिल्पाविष्कार!
वाघीधानोरा ता.जिंतुर जि.परभणी या गावापासुन १ कि.मी अंतरावर दक्षीणेला ओढ्याच्या काठावर रामदरा हे ठिकाण आहे.येथे हेमाडपंती शिवलींग महादेव मंदीर व दोन देवीचे मंदीर आहेत.येथील मंदीराच्या खांबावर शिल्पकलेचा अविष्कार बघावयास मिळतो.
मंदीराच्या अर्धमंडपाच्या भिंतीवर कामक्रीडा शिल्पे आहेत.तसेचं ऋषी-मुनी,व्याल,गज,मानव शिल्प आहेत.स्थानिक येथील महादेवाला ओमकारेश्वर म्हणतात.मंदीराचा जिर्णोद्धार करताना येथील शिल्पांना पेंट कलर दिला आहे.त्यामुळे जुणं रुप हे मंदीर हरवुन बसले आहे.देवीच्या मंदीरात एकुण तिन शिल्प आहेत.माञ भक्तांनी शेंदुर लावल्यामुळे शिल्प समजण्यास अडथळा येतो.स्थानिक या देवीला तुळजाभवानी म्हणतात.शिल्पांचे निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की हि तुळजाभवानी नसुन महिषासुरमर्दिनी आहे.
तसेचं येथील डोंगरावर काही शिल्प आहेत.जे बहुधा विरगळ प्रकारातील असावे.
मराठवाड्यात स्थपती आणि शिल्पी यांचा शिल्पाविष्कार आहे माञ कुठे ऑईल पेंट मारुन तर कुठे शेंदुर फासुन हा प्राचीन वारसा संपवण्याचे काम येथील लोक करत आहेत.संवर्धन करणे तर लांबचं पण शिल्पकलेचे हे दगड धुने धुन्यासाठी वापरतात हे आमच्या मराठवाड्याचं शिल्पकलेवर असलेले प्रेम आहे.
#incrediblemarathwada
✍संदीप डाके ।Blogger
©२०१७
ब्लॉग व येथील संपुर्ण फोटो खालील लिंकवर
खूप छान फोटो . या सोबत प्रत्येक फोटोंचे वर्णन केल्यास किंवा त्याला कॅपशन टाकल्यास अजून छान वाटेल.
ReplyDeleteलक्ष्मीकांत सोनवटकर
ReplyDeleteचारठाणा